scorecardresearch

चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म, आता दुसऱ्यांदा आई होणार ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, पोस्ट व्हायरल

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म, आता दुसऱ्यांदा आई होणार ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, पोस्ट व्हायरल
अभिनेत्री देबिना बॅनर्जी आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

मालिका विश्वामधील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वीच देबिनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या ११ वर्षानंतर घरी चिमुकलीचं आगमन झाल्यामुळे हे सेलिब्रिटी कपल खूपच खुश आहे. आता हा आनंद आणखीनच द्विगुणीत होणार आहे.

आणखी वाचा – कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

देबिनाने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच पती गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि मुलगी लियाना चौधरी (Lianna Choudhary) फोटो पोस्ट केला आहे. तसेच या फोटोबरोबर तिने सोनोग्राफी रिपोर्टदेखील दाखवला आहे.

फोटो शेअर करताना देबिनाने म्हटलं की, “काही निर्णय हे देवाच्या हाती असतात. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही. हा असाच एक आशीर्वाद आहे. आमचं कुटुंब पूर्ण करण्यासाठी लवकरच नवा पाहुणा येत आहे.” देबिनाने ही पोस्ट शेअर करताना हॅशटॅग सेकंड बेबी असं म्हटलं आहे. देबिनाने आनंद व्यक्त करताच कलाविश्वातील अनेक मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

देबिनाने बरीच वर्ष गरोदरपणासाठी प्रयत्न केले. अखेरीस सरोगसीच्या मदतीने तिने ३ एप्रिल २०२२मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. आता गुरमीत-देबिनाच्या कुटुंबामध्ये आणखी एका नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या