चित्रपटांना कात्री लावणे हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. ब-याचदा सेन्सॉरकडून चित्रपटातील असलेल्या प्रणयदृश्यांना किंवा बोल्ड सीन्सना कात्री लावली जाते. चित्रपटांना लावण्यात येणा-या कात्रीमुळे दिग्दर्शक आणि सेन्सॉर यांच्यात वाद होतच असतात. पण, ब-याचा याच कारणामुळे ते चित्रपट उलट आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात येतात. काही वेळा अशाप्रकारची दृश्ये चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग असतात. मात्र, केवळ सेन्सॉरच्या आदेशामुळे चित्रपटांतील या दृश्यांना कात्री लावावी लागत असे. पण, आता बोल्ड सीन असलेल्या चित्रपटांना आता यातून सुटका मिळाली आहे. सेन्सॉर बोर्डाने श्याम बेनेगल यांच्या कमिटीने दिलेल्या काही सुचनांवर विचारविनिमय करण्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉरच्या या निर्णयामुळे बोल्ड सीन असणा-या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना काहीसा मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटांतील दृश्यांना कात्री लावण्याऐवजी एखाद्या वेगळ्या श्रेणीत टाकण्यात येईल. जर सेन्सॉरने या विषयावर गंभीरपणे विचार केला तर दिग्दर्शकांच्या समोर असणारे अडथळे कमी होतील. चुंबन दृश्य, शिवीगाळ आणि प्रणयदृश्य असणारे चित्रपट A म्हणजेच अॅडल्ट विभागात टाकले जायचे. पण, आजकाल बनणा-या प्रत्येक चित्रपटात अशाप्रकारची दृश्य असतात. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपटासाठी यूए प्रमाणपत्राची मागणी करण्यासाठी सेन्सॉरशी वाद घालतात. या कारणामुळे सेन्सॉर बोर्डाने एक वेगळा विभाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विभागाची माहिती लवकरच सेन्सॉर बोर्ड सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवणार आहे. जर मंत्रालयाने यास परवानगी दिली तरच छायाचित्रण कलमात बदल करण्यात येईल. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातून काही प्रणयदृश्य हटविण्यात आली होती. अनुराग कश्यपच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटावरूनही बराच वाद झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Censor board working on major changes in the cinematography act
First published on: 11-11-2016 at 13:08 IST