बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा आगामी पृथ्वीराज हा चित्रपट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अमित शाह हे पृथ्वीराज चित्रपट पाहणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन दिवस आधी पाहणार आहे. “आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शाह, भारतमातेच्या शूर पुत्रांपैकी एक, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवनावरील महाकाव्याचे साक्षीदार होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांची जीवनगाथा ते पाहणार आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १ जून रोजी दिल्लीत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले जाणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अमित शाह यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री आणि दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

पृथ्वीराज या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Prithviraj Trailer: “धर्मासाठी जगलोय आणि धर्मासाठी मरेन…”, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.