scorecardresearch

“माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

त्याच्या घोरण्याच्या आवाजाने कुशल बद्रिकेची झोप उडालेली दिसत आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. विनोदाचे बादशाह, हुकमी एक्के अशी या दोघांची ओळख आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

भाऊ कदम यांचा काल ३ मार्च रोजी वाढदिवस होता. या निमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणूस म्हणजे “भाऊ कदम”, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्‍या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन”घोर” शुभेच्छा”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो भाऊ कदम यांच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. यावेळी भाऊ कदम हे जोरजोरात घोरत असल्याचे दिसत आहे. त्याच्या घोरण्याच्या आवाजाने कुशल बद्रिकेची झोप उडालेली दिसत आहे. भाऊ कदम यांच्या नकळत त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्याने ही व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

“तुझा आजचा दिवस अन्…”, ‘आई कुठे काय करते’मधील संजनाने अरुंधतीसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत

दरम्यान भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ‘दादा परत या ना हसवा ना…’ हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली आहे. ‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची आहे. या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chala hawa yeu dya kushal badrike wishes bhau kadam on his birthday with a hilarious video nrp

ताज्या बातम्या