अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे. अशात प्रसाद ओकच्या पत्नीच्या वाढदिवशी अमृतानं इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी शेअर केलेली पोस्ट बरीच चर्चेत आहे.
अमृतानं तिच्या इन्स्टाग्रामवर प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकचा केक कापतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं मंजिरीसाठी खूपच खास पोस्ट लिहिली आहे. अमृतानं लिहिलं, ‘माझ्या प्रिय मंजिरी… ही तू आहेस. तुझ्या खऱ्याखुऱ्या आणि निरागस रुपात. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. एक कुशन, पंचिंग बॅग आणि बरंच काही… तुझ्या प्रत्येक वाढदिवशी मी तुझं बेस्ट व्हर्जन पाहते. तू कोणाचंही ऐकू नकोस. जे तुला करावं वाटतं ते तू नक्की कर, कारण हीच गोष्ट तुला जिवंत ठेवते. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव… नेहमीच आणि कायमचा… खूप प्रेम… वाढदिवसाच्या शुभेच्छा मंजिरी…’
आणखी वाचा- “…म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला” Lock Upp मध्ये अंजली अरोराचा धक्कादायक खुलासा
मंजिरी ओकच्या वाढदिवशी अमृता खानविलकरनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत प्रसाद ओकनं कमेंट केली आहे. तसेच मंजिरी ओकनंही अमृताच्या पोस्टवर कमेंट करत तिचे आभार मानले आहे. ही पोस्ट आणि त्यावरील कमेंट पाहता मंजिरी आणि अमृता यांच्यातील मैत्री आणि खास बॉन्डिंग लक्षात येतं. अमृताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही मंजिरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.