मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सध्या ती चंद्रमुखी या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होताना दिसत आहे.

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच तिने अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने एक छान पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चंद्रमुखी चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने त्यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

“मला माझ्या वयाच्या ६० व्या वर्षी स्वत:ची मुलं…”, कतरिना कैफने सांगितला फॅमिली प्लॅन

या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “ज्यांनी गेली दोन वर्ष सगळं घडवलं…. सांभाळलं…. हाथ धरून पुढे न्हेलं असे आमचे …. अक्षय बर्दापूरकर ह्यांना वंदन करून तुम्हा सर्वांना अक्षय त्रितियाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे तिने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान अमृता खानविलकर ही सध्या चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

“कुटुंबाने काम न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला कारण…”, ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणींचा खुलासा

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.