Video : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी, म्हणाली “प्रमोशनच्या गडबडीत…”

अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.

Amruta Khanvilkar visit tuljapur

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकर ही चंद्रमुखी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.

अमृता खानविलकर ही गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तिने चंद्रा या नृत्यांगणेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता अमृताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अमृताने देवदर्शनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती देवदर्शन करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.

अमृता खानविलकरची पोस्ट

“लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे …. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला ….. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं …. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरला आहे. जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandramukhi fame actress amruta khanvilkar visit tuljapur and akkalkot for darshan share special post nrp

Next Story
‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून आयुष शर्मा बाहेर, सलमान खानसोबत बिनसल्याच्या चर्चांना उधाण
फोटो गॅलरी