टेलिव्हिजनवर अनेक वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका कोणती असे कोणालाही विचारल्यास ‘सीआयडी’ हे नाव नक्कीच ऐकायला मिळणार. सरकार बदललं, मुलं लहानाची मोठी झाली तरी गेल्या १९ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. टेलिव्हिजनवर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली ही एकमेव मालिका असेल. गेल्या १९ वर्षांत मालिकेतील काही पात्रेही बदलली. दीर्घकाळापासून चाललेल्या या मालिकेतील कलाकारांना मानधन किती मिळत असेल, असा प्रश्न अनेकांच्याच मनात डोकावत असेल. या कलाकारांच्या मानधनाचा आकडा विविध वेबसाइट्सवर प्रसिद्ध केला असून मालिकेशी निगडीत व्यक्तींनी अद्याप याविषयी काहीच स्पष्ट केलेले नाही. पण या कलाकारांचे मानधन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कलाकारांच्या मानधनाचा आकडा पाहता टेलिव्हिजनला छोटा पडदा म्हणण्याचा काळ गेला असं म्हणावं लागेल. कारण, आता टेलिव्हिजनची कलाकार मंडळी चित्रपटातील कलाकारांइतकेच पैसा कमवू लागले आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न’. अभिनेते शिवाजी साटम गेली १९ वर्षे ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारत आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते किती मानधन घेतात? ‘देसी मार्टिनी’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिवाजी साटम एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये इकते मानधन घेतात. विशेष म्हणजे साटम ‘सीआयडी’ मालिकेसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check out how much the cast of cid charged per episode
First published on: 21-08-2017 at 15:00 IST