Chetak Screen Awards 2026 Winners List: बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा गौरव करण्यासाठी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’चा सोहळा बऱ्याच वर्षांनी पुन्हा रंगला. १९९५ मध्ये ‘स्क्रीन अवॉर्ड्स’ची सुरुवात झाली होती. स्क्रीन अवॉर्ड्स हे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलागुणांना सन्मानित करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ राहिले आहे. आज ३१ कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांना व तंत्रज्ञांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे सर्व विजेत्यांची निवड आमच्या प्रतिष्ठित ‘स्क्रीन अकादमी’ने केली आहे. या अकादमीत ५३ नामवंत चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. ही एक स्वतंत्र आणि ना-नफा संस्था आहे.
मुंबईत आज रविवारी, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता मुख्य सोहळा सुरू झाला. बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट, कॉमेडियन झाकीर खान आणि सुनील ग्रोव्हर, तसेच ‘द इंडियन एक्सप्रेस’ हिंदीचे संपादक सौरभ द्विवेदी या सोहळ्याचे होस्ट होते. चेतक स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले. या सोहळ्यातील रेड कार्पेटवरील खास क्षण व विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घेऊयात.
चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट अशा एकूण ३१ श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले. हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल. आदित्य धर यांच्या धुरंधर या ‘स्पाय थ्रिलर’ चित्रपटाला सर्वाधिक २४ नामांकनं मिळाली होती, त्यापैकी या चित्रपटाने १४ पुरस्कार पटकावले.
Chetak Screen Awards 2026 Updates : चेतक स्क्रीन अवॉर्ड्सचे अपडेट्स
'होमबाउंड' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या 'होमबाउंड' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार देण्यात आला.
'धुरंधर'चे आदित्य धर ठरला सर्वोत्तम दिग्दर्शक
आदित्य धर याला 'धुरंधर' चित्रपटासाठी 'सर्वोत्तम दिग्दर्शका'चा 'चेतक स्क्रीन पुरस्कार २०२६' मिळाला. अवॉर्ड सोहळ्यात धुरंधरने एकूण १४ पुरस्कार पटकावले.
'हक'साठी यामी गौतमला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार
'हक' या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयासाठी यामी गौतमने 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार पटकावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी तिच्या नावाची घोषणा केली.
रणवीर सिंह ठरला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'
'धुरंधर' चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयासाठी रणवीर सिंहने 'चेतक स्क्रीन अवॉर्ड' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
धर्मेंद्र यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' मध्ये दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जावेद अख्तर आणि रमेश सिप्पी यांनी मंचावर येऊन धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र यांच्या महान कार्याचा गौरव करत 'चेतक स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार' प्रदान केला. धर्मेंद्र या पुरस्कार मुलगा बॉबी देओल याने हा स्वीकारला. या प्रसंगी भावूक झालेल्या बॉबीने सर्वांचे आभार मानले.
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स'ने २०२५ मध्ये आपल्याला सोडून गेलेल्या दिग्गजांचे केले स्मरण
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' सोहळ्यात, २०२५ आपल्याला सोडून गेलेल्या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचाही गौरव करण्यात आला. एका विशेष व्हिडीओत या कलाकारांची छायाचित्रे मोठ्या पडद्यावर झळकली. त्यामध्ये अच्युत पोतदार, असरानी, धर्मेंद्र, चंद्र बारोट, धीरज कुमार, कामिनी कौशल आणि मनोज कुमार यांचा समावेश होता.
'हक'ला 'लैंगिक संवेदनशीलता' श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स'च्या 'लैंगिक संवेदनशीलता' (Gender Sensitivity) श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाच्या स्पर्धेत, दिग्दर्शक सुवर्ण वर्मा यांच्या 'हक' चित्रपटाने बाजी मारली.
'होमबाउंड'साठी शालिनी वत्सा यांना मोठे यश
'होमबाउंड'च्या शालिनी वत्सा यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' म्हणून गौरवण्यात आले.
'स्टोलन'ला सर्वोत्कृष्ट OTT चित्रपटाचा पुरस्कार
दिग्दर्शक करण तेजपाल यांच्या 'स्टोलन' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट OTT चित्रपट' म्हणून गौरवण्यात आले. अभिनेता-पटकथा लेखक सौरभ शुक्ला आणि निर्माती गुनीत मोंगा यांनी चित्रपटाच्या टीमला हा पुरस्कार प्रदान केला.
'स्टोलन'ने पटकावला तिसरा पुरस्कार
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' मध्ये ओटीटीमध्ये स्टोलनचा जलवा पाहायला मिळतोय. स्टोलनसाठी या चित्रपटाने करण तेजपाल यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' (OTT) हा पुरस्कार मिळाला.
'Mrs' चित्रपटासाठी सान्या मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
ओटीटीवरील 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार 'Mrs' या चित्रपटासाठी सान्या मल्होत्राला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार अक्षय खन्नाला
धुरंधरसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार अक्षय खन्नाला देण्यात आला.
स्टोलनचा अभिषेक बॅनर्जी ठरला ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेता
दिग्दर्शक करण तेजपालच्या स्टोलनला आणखी एक पुरस्कार मिळाला. अभिषेक बॅनर्जीला ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
'स्टोलन'ला सर्वोत्तम पटकथेचा ओटीटी पुरस्कार
करण तेजपाल, गौरव धिंग्रा आणि स्वप्नील साळकर यांनी 'स्टोलन' या चित्रपटासाठी 'सर्वोत्तम पटकथा – ओटीटी चित्रपट' श्रेणीतील 'चेतक स्क्रीन पुरस्कार' पटकावला आहे.
गुलजार यांना 'बेस्ट लिरिक्स' पुरस्कार, तर सैयाराला तीन पुरस्कार
'गुस्ताख इश्क' मधील 'उल जुलूल इश्क' या गीतासाठी गुलजार यांना 'बेस्ट लिरिक्स'साठी 'चेतक स्क्रीन पुरस्कार' मिळाला. तर 'सैयारा' या शीर्षक गीताने 'सर्वोत्कृष्ट गाणे', 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – पुरुष' (फहीम अब्दुल्ला) आणि 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – महिला' (श्रेया घोषाल) या श्रेणींमधील पुरस्कार पटकावले.
बादशाहच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत वाढली
रॅपर आणि गायक-गीतकार बादशाहने आपल्या आपल्या परफॉर्मन्सने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला आणि सोहळ्याची रंगत वाढली.
अहान पांडे, अनित पड्डाला पुरस्कार
दिग्दर्शक मोहित सुरीच्या सैयारा या चित्रपटासाठी अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी पदार्पणासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
'धडक २' च्या शाझिया इक्बाल ठरली 'ब्रेकथ्रू डेब्यू डायरेक्टर'
'ब्रेकथ्रू डेब्यू डायरेक्टर' या श्रेणीमध्ये, 'धडक २' च्या शाझिया इक्बालने बाजी मारली.
'धुरंधर'ला सर्वोत्तम डायलॉगला पुरस्कार
'धुरंधर'ने सर्वोत्तम डायलॉगसाठी 'चेतक स्क्रीन पुरस्कार' पटकावला.
'होमबाउंड'ला सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेचा पुरस्कार
नीरज घायवानच्या 'होमबाउंड'ला सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेचा चेतक स्क्रीन अवॉर्ड देण्यात आला.
'धुरंधर'च्या प्रीतिशील सिंग डिसूझाला 'सर्वोत्कृष्ट हेअर स्टायलिंग व मेकअप' पुरस्कार
'धुरंधर'च्या प्रीतिशील सिंग डिसूझा हिने 'सर्वोत्कृष्ट हेअर स्टायलिंग व मेकअप' हा पुरस्कार पटकावला.
'धुरंधर' आणि 'छावा'ला 'सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम' पुरस्कार
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' मध्ये, शीतल इक्बाल शर्मा आणि स्मृती चौहान यांना 'छावा' आणि 'धुरंधर' या चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी 'सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम'चे पुरस्कार देण्यात आले.
'धुरंधर'ला 'सर्वोत्कृष्ट ॲक्शन'चा पुरस्कार
'धुरंधर' या चित्रपटातील कामासाठी एजाज गुलाब, सी यंग ओह, यॅनिक बेन आणि रमझान बुलुत हे विजेते ठरले.
'धुरंधर'मधील विजय गांगुलीला 'सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शना'चा पुरस्कार
'धुरंधर' या चित्रपटातील 'शरारत' या गाण्यासाठी विजय गांगुलीने 'सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शना'चा 'चेतक स्क्रीन पुरस्कार' पटकावला आहे.
'धुरंधर'च्या नावे सहावी ट्रॉफी
'धुरंधर' चित्रपटाचे संगीतकार शाश्वत सचदेव यांनी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीता'साठीचा 'चेतक स्क्रीन पुरस्कार' पटकावला आहे. मनोज आणि सीमा पाहवा या लोकप्रिय जोडीने हा पुरस्कार चित्रपटाचेसाऊंड डिझायनर विश्वदीप चॅटर्जींना दिला.
'धुरंधर'साठी सैनी एस. जोहरे यांना 'सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन'चा पुरस्कार
'सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन' या श्रेणीत 'धुरंधर'साठी सैनी एस. जोहरे विजेते ठरले.
'धुरंधर'ची विजयी घोडदौड सुरूच
'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' हा सोहळा 'धुरंधर' चित्रपटासाठी खास ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने आज रात्रीचा आपला चौथा पुरस्कार पटकावला आहे. 'सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स' (SFX) या श्रेणीमध्ये धुरंधरने बाजी मारली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा आणि निर्माते योगेश लखानी यांनी चित्रपटाच्या SFX टीमला हा पुरस्कार प्रदान केला.
'धुरंधर'च्या विकास नौलखाला 'सर्वोत्कृष्ट छायाचित्रण' पुरस्कार
'धुरंधर' या चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट छायाचित्रण' श्रेणीतील 'चेतक स्क्रीन अवॉर्ड २०२६' पटकावला.
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनिंगचा पुरस्कार कोणाला?
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनिंगचा पुरस्कार धुरंधरसाठी विश्वजीत चॅटर्जीला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंगचा पुरस्कार धुरंधरसाठी शिवकुमार पाणिकरला देण्यात आला.

चेतक स्क्रीन अवॉर्ड्सचे अपडेट्स
