बॉलिवूड गाजवणारी ही चिमुकली आहे पोलीस अधिकाऱ्याची लेक!

तिची लय भारी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती.

लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव अनेकांच्या मनावर जादू करतात. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्येदेखील बाल कलाकरांचा वावर वाढला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी देखील बालकलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज तेच कलाकार लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जात आहेत. या बालकलाकारांच्या यादीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे मृणाल जाधव. पदार्पणातच एका पेक्षा एक हिट सिनेमातून तिने काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवली.

मृणालचे नाव घेताच अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटातील लहान मुलीचा निरागस चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. तिचे बाबा मुंबई पोलीस खात्यात कार्यरत आहेत. मृणालला अभिनय क्षेत्रात येण्याचे प्रोत्साहनदेखील तिच्या वडिलांनी दिले आहे. आई पेक्षा तिचे बाबासोबत चांगले बॉन्डींग आहे. बऱ्याच वेळा चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे मृणालला वडिलांसोबत वेळ घालवता येत नाही. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती वडिलांसोबत घालवण्याचा प्रयत्न करत असते. ‘माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे’ असे मृणालने म्हटले होते.

मृणालने आतापर्यंत ‘तू ही रे’, ‘लय भारी’, ‘नागरीक’, ‘कोर्ट’, ‘टाईमपास २’, ‘अ पेईंग घोस्ट’ आणि ‘अंड्याचा फंडा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘लय भारी’ चित्रपटातील रुक्मिणीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. तसेच मृणालने ‘राधा ही बावरी’ , ‘उंच माझा झोका’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Child actress mrunal jadhav is daughter of mumbai police man avb

ताज्या बातम्या