चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर पहिल्यांदाच एकत्र!!

या चित्रपटासाठी करणार एकत्र काम

chinmay udgirkar, suruchi adarkar, suruchi adarkar upcoming movie, chinmay udgirkar upcoming movie,

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर “A फक्त तूच” या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचे टीझर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची कथा त्यांचीच असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत. तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.

समुद्राची उसळलेली लाट आणि गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीझर पोस्टरवरून लावला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinmay udgirkar suruchi adarkar upcoming movie avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या