VIDEO : आईसाठी हा सुपरस्टार झाला शेफ; करतोय रोज नवनवीन पदार्थ

लॉकडाउनमध्ये आईला आराम मिळावा म्हणून अभिनेता करतोय जेवण

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. आजवर चित्रपटांमधील धमाकेदार अॅक्शन सीन्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे चिरंजीवी आज आपल्या आईसाठी चक्क जेवण करत आहेत. त्यांना उत्तम जेवण करता येतं असं त्यांनी आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. परंतु आज त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा पुरावा देखील आपल्या चाहत्यांना दिला.

चिरंजीवी आपल्या इन्स्टाग्राम आकाउंटवर नेहमीच कुठले ना कुठले फोटो किंवा व्हिडीओज शेअर करत असतात. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी चक्क डोसा करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लॉकडाउनध्ये घरात राहून आपल्या आई-वडिलांची सेवा करा असा संदेश त्यांनी या व्हिडीओमार्फत आपल्या चाहत्यांना दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela) on

एखाद्या अनुभवी कूक प्रमाणे ते या व्हिडीओमध्ये डोसा करताना दिसत आहेत. हा डोसा ते स्वत:च्या हातांनी आपल्या आईला खाऊ घालत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण तर त्यांचे आपल्या आईवरील प्रेम पाहून भाउक देखील झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chiranjeevi make food for his mother mppg

ताज्या बातम्या