मेगास्टार चिरंजीवी आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे दोघे एका बिग बजेट चित्रपटात एकत्र झळकणार आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘गॉडफादर’. येत्या ५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा एक टीझर प्रदर्शित केला होता. हा टीजर पाहून सगळ्यांनाच या सिनेमाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. आता याच चित्रपटातील एका गाण्याचा प्रोमो व्हायरल होत आहे.

याच चित्रपटातील एका गाण्यात चिरंजीवी आणि सलमान खान दोघे दिसणार आहेत. या गाण्याची एक झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. ज्यात हे दोघे थिरकताना दिसून येत आहेत. हे गाणे प्रभुदेवाने कोरिओग्राफ केले आहे. त्याने ‘वॉन्टेड’, ‘दबंग ३’ आणि ‘राधे’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘गॉडफादर’ हा पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लुसिफरचा’ रिमेक आहे. मुळ चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनची भूमिका सलमान खान साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा करणार आहेत.

रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार!!

गॉडफादरमध्ये नयनतारा, सत्यदेव, बिजू मेनन आणि मुरली मोहन यांचा समावेश आहे. सलमान खान चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चिरंजीवीने याआधी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिरंजीवी त्याच्या नृत्यकौशल्यांसाठी ओळखला जातो. सलमान खानचीदेखील आपली एक वेगळी नृत्य शैली आहे. सुरुवातीला सलमाननं या चित्रपटासाठी थेट नकार दिला होता. चित्रपटाच्या मेकर्ससोबत मानधनाच्या मुद्द्यावरून सलमानचा वाद झाला होता.

चिरंजीवी आणि सलमान हे दोन सुपरस्टार प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्यात यशस्वी होणार का? हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. या टीजरमुळे बॉलिवूडप्रेमी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियावर सगळेच या चित्रपटाचं स्वागत करत आहेत. सलमानचे ‘टायगर ३’ आणि ‘भाईजान’ हे दोन्ही चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.