हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली होती. त्यानंतर विल स्मिथवर ऑस्करने कडक कारवाई करत त्याच्यावर १० वर्षांची बंदी घातली होती. यानंतर विल स्मिथ हा चांगलाच चर्चेत आला होता. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर क्रिस रॉकची आई रोझ रॉक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने विल स्मिथवर टीकाही केली आहे.

क्रिस रॉकची आई रोज रॉक या प्रसिद्ध लेखिका आणि प्रेरणादायी वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. नुकतंच एका कार्यक्रमात रोझ रॉकने या संपूर्ण घटनेवर भाष्य केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “या घटनेनंतर माझा मुलगा व्यवस्थित वाटत असला तरीही तो या घटनेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. विलने जेव्हा क्रिसला कानशिलात लगावली तेव्हा त्याने आम्हा सर्वांना कानशिलात लगावली, असे वाटलं. त्याने मला कानशिलात लगावली, असेही त्यावेळी वाटत होतं. कारण जेव्हा तू माझ्या मुलाला दुखावतोस तेव्हा तू मलाही दुखावतोस.”

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
Do not want to think what doctor said Shreyas Iyer
Shreyas Iyer : केंद्रीय करार आणि दुखापतीवर श्रेयसने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यावर…’

“मी यावर काय बोलू मला काहीही समजत नाही. मला नाही माहिती की यापलीकडे मी त्याच्याशी याबाबत नक्की काय बोलू शकेन. विल तू त्यावेळी जगाचा विचार केला होतास का? पण तू जे कृत्य केलेस त्यामुळे खूप गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. कदाचित त्यामुळे क्रिस हा मागे पडला असता. कदाचित यासाठी तुला अटक होऊ शकली असती. पण तू याबद्दल जराही विचार केला नाही. तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि स्टेजवर जाऊन क्रिसच्या कानशिलात लगावली. तिला त्यावेळी लाज वाटत होती, म्हणून तू हे केलेस. यामुळे तिचा दिवस चांगला झाला”, असे रोझ रॉक म्हणाल्या.

त्यापुढे रोझ रॉक म्हणाल्या की, “विलवर १० वर्षांची बंदी घालण्याचा उपयोग काय? कारण कोणीही यासाठी दरवर्षी जात नाही. त्यापेक्षा अकादमीला स्मिथचा ऑस्कर पुरस्कार परत घ्यावा, असे का वाटलं नाही. कारण स्मिथने सोशल मीडियावर माफीनामा शेअर केला होता म्हणून. पण मला वाटत नाही की त्याने त्यावर मनापासून माफी मागितली. मला याचे फार वाईट वाटते की त्याने कधीही या प्रसंगी मनापासून माफी मागितली नाही. फक्त चार ओळी लिहून क्रिस रॉक मी तुझी माफी मागतो, असे त्याने म्हटले. पण त्यापेक्षा त्याने प्रत्यक्ष येऊन माफी मागायला हवी होती.”

नेमकं प्रकरण काय?

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा काल (२८ मार्च) आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली.

सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण नंतर काही व्हिडीओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथला त्याचा ऑस्कर पुरस्कार परत करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली होती.