Oppenheimer New Trailer : अणूबॉम्बचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या आगामी ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नोलनच्या या चित्रपटाची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. शिवाय याआधी आणखी एक छोटा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता, पण हा नवा ट्रेलर कथानकाबद्दल अधिक विस्तृत माहिती देतो.

नोलन या चित्रपटाच्या माध्यमातून जे रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाची कथा सांगणार आहे. ओपनहायमर हे यूनिवर्सिटी ऑफ कैलिफॉर्निया मध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मध्येही योगदान दिलं आहे, यामुळेच त्यांना अणूबॉम्बचा जनक मानलं जातं.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : अभिनयातून ब्रेक घेणारा आमिर खान अध्यात्माच्या वाटेवर? अभिनेत्याने गाठलं थेट नेपाळचं विपश्यना केंद्र

ट्रेलरमध्ये ओपनहायमर हे अणूबॉम्ब बनवण्यासाठी घेत असलेले कष्ट, त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय तणाव, वैज्ञानिकांसमोर उभी असलेली वेगवेगळी आव्हानं तसेच त्या वैज्ञानिकांचं खासगी आयुष्य हे सगळं आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. कशारीतीने हा अणूबॉम्ब बनवण्यासाठी तयारी करण्यात आली अन् त्याचा मनुष्याने कसा वापर केला अन् त्यातून निर्माण झालेला विध्वंस हा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

ट्रेलरच्या शेवटी जग ज्यासाठी तयारच नव्हतं अशी असामान्य शक्ती मानवाच्या हाती सुपूर्त करणाऱ्या ओपनहायमर यांना जबाबदार ठरवून समाजातून होणाऱ्या त्रासाचा सामना करताना दाखवलं आहे. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका किलियन मर्फी साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून नेहमीप्रमाणेच नोलनने लोकांना चकित केलं आहे. २०२० च्या ‘टेनेट’ नंतर आता नोलनच्या या चित्रपटाची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.