बॉलिवुडमधील कलाकारांनी दोन शब्द मराठीत म्हंटले तरी त्याची लगेच चर्चा होते. ‘चूप’ चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकणारा दाक्षिणात्य अभिनेता दुलकिर सलमान सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहेत्यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. मात्र सलमानने या आधीच बॉलिवुडमध्ये आपले पदार्पण केले आहे. ‘कारवा’ या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दाखल झाला. या चित्रपटात त्यांच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर, दिवंगत अभिनेता इरफान खान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान मिथिला पालकर, दुलकिर सलमानने यांनी एका कार्यक्रमात एक गंमतीशीर खेळ खेळला होता. ज्यात मिथिलाने मराठी चित्रपटातील संवाद हे दुलकिरकडून म्हणून घेतले तर दुलकिरने मल्याळम चित्रपटातील संवाद मिथिलाकडून म्हणून घेतले. दुसऱ्या भाषेतील संवाद म्हणताना दोघांची बोबडी वळली. मात्र सलमानने ‘लय भारी’ चित्रपटातील संवाद असो किंवा ‘सैराट’ चित्रपटातील संवाद असो सगळे मराठी संवाद उत्तमरीत्या म्हंटले आहेत. हिंदी चित्रपटांप्रमाणे ‘लय भारी’ ‘सैराट’ मराठी चित्रपटातील संवाद चांगलेच गाजले होते.

आणखीन वाचा : आनंद दिघेंनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवीचं प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडेने घेतलं दर्शन

बॉलिवूडमध्ये गोविंद, अक्षय कुमार उत्तम मराठी बोलतात. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे यांसारख्या मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविला आहे. आमिर खानने देखील मध्यंतरी मराठी भाषा शिकली होती. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने ‘लय भारी’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते. आज बॉलिवूडमध्ये आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, ओम राऊतसारखे दिग्दर्शक कार्यरत आहेत.

दुलकिर सलमानने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. नुकताच त्यांचा ‘सीता रामम’ हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चार्ली, ‘उस्ताद हॉटेल’, ‘बंगलोर डेज’ हे त्याचे गाजलेले मल्याळम चित्रपट आहेत. दुलकिर सलमान सुपरस्टार मामुत्ती यांचा मुलगा आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील तो एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chup actor dulquer salman speak dialouge from marathi film lai bhari spg
First published on: 29-09-2022 at 13:17 IST