scorecardresearch

CID मधील दयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं

त्यामुळे दयाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील दया हा लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे दयाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

CID या मालिकेतून प्रसिद्धझोतात आलेला अभिनेता म्हणून दयानंद शेट्टीला ओळखले जाते. दयानंद शेट्टी याने या CID या मालिकेत दयाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील ‘दया दरवाजा तोड दो’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेतील दया हा लवकरच एका चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे नुकतंच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.

नुकतंच मुहूर्त झालेल्या या चित्रपटाचे नाव ‘गरम किटली’ असे आहे. हा एक मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली ‘गरम किटली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

या चित्रपटाच्या शूटींगला आज (९ मार्च) पासून सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन हे राज पैठणकर यांनी केले आहे. तेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहेत. ‘गरम किटली’ या चित्रपटात दया नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात पाहायला मिळत आहे.

“माझं म्हणणं इतकंच की…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटात दयासोबत आदित्य पैठणकर आणि श्रद्धा महाजन ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबच विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्टही या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cid actor dayanand shetty to make marathi debut in raj paithankar garam kitali movie nrp

ताज्या बातम्या