scorecardresearch

“आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल”; कंगनाचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

कंगनाचे हे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

cm uddhav thackeray left varsha bunglow, kangana ranaut,
कंगनाचे हे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच आपलं शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. त्यांनी आपला मुक्काम ‘मातोश्री’वर हलवला आहे. या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

कंगनाचा व्हायरल झालेल्या या व्हिडीओ ती बोलते, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा.”

आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

आणखी वाचा : “अभद्र युत्या, पक्षनिष्ठा…”; महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

कंगनाचा फक्त हाच व्हिडीओ व्हायरल होत नाही, “जेव्हा कुणी व्यक्ती महिलांचा आदर करु शकत नाही, तेव्हा त्यांचं पतन निश्चित आहे.” कंगनाची ही जुनी वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उदभवलेली सध्याची परिस्थिती पाहता अनेकांनी हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray left varsha bunglow kangana ranaut s old videos went viral on social media dcp

ताज्या बातम्या