खंडेरायाच्या आशीर्वादाने होणार का अक्षय-अमृताच्या नव्या नात्याची सुरुवात?

अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार

'घाडगे & सून'

कलर्स मराठीवरच्या ‘घाडगे & सून’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. घाडगेंच्या घरात सध्या भक्तीमय वातावरण आहे. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. घाडगेंच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात, पण लग्नापासूनच अक्षय-अमृताच्या लग्नात अनेक विघ्न आल्याने हा पारंपरिक विधी मात्र राहून गेला होता. मात्र नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने आता या विधीसाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीसाठी रवाना झालं आहे. या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. एकीकडे अक्षयला मात्र हा विधी अमृतासोबत करणं थोडसं कठीण जातंय. तर दुसरीकडे अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे.

अक्षय अपघातातून सुखरूप बचावाल्यानंतर मृदलाने बोललेला नवस फेडण्यासाठी अखेर घाडगे जेजुरीला जायला निघतात. देव दर्शनासोबतच घाडग्यांच्या जुन्या गावातल्या घरातले घाडग्यांचे काही सुंदर क्षण अमृतलाही अनुभवायला मिळणार आहेत. चुलीवर जेवण शिजवणं, चांदण्या रात्रीत मोकळ्या अंगणात गप्पा, अक्षयसोबत घालवलेले काही निवांत क्षण यामुळे कदाचित अक्षय-अमृताचं नातंही अजून खुलेल. तर दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा कुठली नवी खेळी खेळणार आहे. रिती-भाती शिकता शिकता अमृता घाडग्यांचे संस्कार, परंपरा कशा शिकणार हे सारं काही पहायला धमाल येणार आहे.

खंडोबाच्या दशर्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. आता अक्षय हा विधी करणार का? अमृताला उचलून अक्षय ही प्रथा पार पाडेल का? खंडोबाच्या आशीर्वादाने अक्षय-अमृताचं नातं खुलणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका १२ ते १८ फेब्रुवारी रात्री ८:३० वाजता ‘घाडगे & सून’चा जेजुरी स्पेशल आठवडा फक्त कलर्स मराठीवर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Colors marathi serial ghadge sun newt track jejuri