‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाला मिळाले अंतिम पाच शिलेदार!

सूरांची स्पर्धा होणार अजून रंगतदार

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आता याच स्पर्धकांमधून फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाला अंतीम पाच शिलेदार मिळाले असून सुरांची स्पर्धा आता अजूनच रंगतदार होणार यात शंका नाही. शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या स्पर्धकांमध्ये आता गाण्याची मैफल रंगेल.

‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. या कार्यक्रमाचा विजेता किंवा विजेती कोण होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रेक्षकदेखील वोटिंगद्वारे त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला हा कार्यक्रम जिंकण्यासाठी मदत करू शकतात. या स्पर्धकांमधूनच महाराष्ट्राला नवीन सूर लवकरच मिळेल. तेव्हा ही सुरांची मैफल, हे संगीत युध्द पाहायला विसरू नका ‘सूर नवा ध्यास’ कार्यक्रमामध्ये सोम ते बुध रात्री ९.३० वााजता फक्त कलर्स मराठीवर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Colors marathi show sur nava dhyas nava top 5 finalist

ताज्या बातम्या