कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या स्पर्धकांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला. त्याला भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सुवर्ण कटयार देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या पर्वात फक्त महाराष्ट्रातून नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर केली. तसेच प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
आणखी वाचा : श्रेयस तळपदेची चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भन्नाट युक्ती, ‘बेबीफेस’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

तब्बल १६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. याच स्पर्धकांमधून अंतिम सहा शिलेदार मंचाला मिळाले. यात आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांच्या नावाचा समावेश होता. या स्पर्धकांमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाअंतिम सोहळा रंगला. या महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठी गाण्याची मैफल आणि संगीत युध्द पाहायला मिळाले. त्यातूनच महाराष्ट्राला नवीन सूर मिळाला.

भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले. उत्कर्ष वानखेडे याने ‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक होण्याचा मान पटकावला.

आणखी वाचा : “मुलगी झाली हो मालिकेतील अधिकृतरित्या निरोप…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार मिळाली. तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून देण्यात आली. तर संज्योती जगदाळे ही या कार्यक्रमाची पहिली उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला. तसेच आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi sur nava dhyas nava utkarsh wankhede winner of the show nrp
First published on: 25-09-2022 at 23:11 IST