scorecardresearch

सुनील ग्रोवर टीव्ही विश्वात परतण्याच्या तयारीत

त्याच्या नव्या क्रार्यक्रमाचे नाव आहे.

सुनील ग्रोवर टीव्ही विश्वात परतण्याच्या तयारीत
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर कपिलसोबत त्यांच्या शोलादेखील या सगळ्याचा फटका बसलेला दिसतोय.

विनोदवीर सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा या दोघांनीही आता एकमेकांच्या वाटा वेगळ्या केल्या आहेत. सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ मधून काढता पाय घेतल्यानंतर तो नव्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात होते. पण, तो नेमका कोणत्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल बरीच साशंकता पाहायला मिळत होती. पण, एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुनील पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुनील सोनी वाहिनीवरील कार्यक्रमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

त्याला ज्या सेटवर पाहण्यात आले होते तो इंडियन आयडल या रिअॅलिटी शोचा सेट होता. सध्या सुनील सोनी वाहिनीसोबतच कारारबद्ध असल्यामुळे त्याला या कार्यक्रमाच्या सेटवर पाहण्यात आले होते. सुनील ग्रोवर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. मशहूर गुलाटी ही व्यक्तिरेखा साकारत होता. त्याच्या नुसत्या एन्ट्रीनेच प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळ पाहायला मिळायचा. पण, कपिलसोबत झालेल्या वादानंतर सुनीलने हा क्रार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचा परिणाम कपिल शर्मा शोच्या टीआरपीवरही परिणाम झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनीलने पुन्हा एकदा कपिलच्या कार्यक्रमात परतण्याचा निर्णय घेतला असून, त्याने आगामी भागासाठीची तयारी सुरु केल्याच्या चर्चा होत्या. पण, त्या सर्व अफवा असल्याचे सुनीलने स्पष्ट केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, ‘ते सर्व खोटे आहे. सध्या तरी मी लाइव्ह शोवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. त्याव्यतिरिक्त मी इतर कोणत्याही बाबतीत जास्त लक्ष देत नसून, मी दुसऱ्या कोणत्याच वाहिनीच्या संपर्कातही नाहीये.’ असे सुनील म्हणाला. त्यामुळे आता सुनील नेमका कोणत्या रुपात त्याच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2017 at 16:34 IST
ताज्या बातम्या