गुत्थीची भूमिका आणि वेशभूषेचे ‘कॉपीराईट्स’?

गुत्थी या पात्राचे नाव, भूमिका किंवा वेशभूषा दुसऱया कोणत्याही वाहिनीवर वापरल्यास कायदेशीर कारवाईची नोटीस काढली आहे.

कलर्स वाहिनीवरील कॉमेडी नाईट्स विथ कपिल मधल्या अत्यंग लोकप्रिय गुत्थीची भूमिका करणाऱया सुनिल ग्रोवरने हा कार्यक्रम सोडल्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोवर आता आपला स्वत:चा कॉमेडी कार्यक्रम दुसऱया वाहिनीवर सुरू करण्याच्या तयारीत आहे.
परंतु, त्याला गुत्थी हे पात्र त्या संबंधित वाहिनीवर साकारता येणार नाही. कारण, कलर्स वाहिनेचे मालक असणाऱया ‘व्हायकॉम १८’ या कंपनीने गुत्थी या पात्राचे नाव, भूमिका किंवा वेशभूषा दुसऱया कोणत्याही वाहिनीवर वापरल्यास कायदेशीर कारवाईची नोटीस काढली आहे.
तशी जाहिरातच आजच्या वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे गुत्थीच्या भूमिका, वेशभूषेचे जणू कॉपीराईट्स व्हावेत अशीच चिन्हे आहेत. यासर्व प्रकरणामुळे सुनिल ग्रोवरला गुत्थीच्या भूमिकेत पुन्हा लोकांसमोर येणे कठीण आहे.
‘व्हायकॉम १८’ ने प्रसिद्ध केलेली नोटीस-

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Comedy nights with kapil producers warn dont copy gutthi