छोटय़ा पडद्यावर सध्या विनोदी मालिका आणि त्यातील कलाकारांनी एकच धमाका उडवून दिला आहे. ‘सब’सारखी एक संपूर्ण वाहिनी आज विनोदी मालिकांना वाहिलेली आहे. ‘कलर्स’पासून ‘झी मराठी’पर्यंत सर्वत्र विनोदी कलाकारांचा बोलबाला आहे. नाही, तेच सध्या या वाहिन्यांचे ‘स्टार’ कलाकार आहेत. या दिवाळीत तर ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत घुसलेल्या विनोदवीरांनी धमाका उडवून दिला. ‘सब’च्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या मालिकेतून दिवाळीची विनोदी बहार उडवून दिली आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे या कलाकारांपासून ते कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किू कू शारदा, दीक्षा वखानी असे कित्येक कलाकार घराघरात ओळखले जातात. विनोदी कलाकार आणि मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल या कलाकारांनाच नेमकं काय वाटतं आहे आणि या बदलामागची त्यांना जाणवणारी कारणं त्यांच्याच शब्दांत..
चिंता वाढल्या की विनोद जवळचा वाटतो..
विनोदी मालिकांचे प्रमाण वाढण्यामागचे खरे कारण तपासले तर लक्षात येईल की, जेव्हा आपल्या चिंता वाढतात तेव्हाच आपल्याला विनोद जवळचा वाटू लागतो. माणूस जेव्हा चिंतेत असतो तेव्हा एकतर तो गाणी गातो किंवा विनोदांना आपलेसे करतो. आज कित्येकदा आयटी क्षेत्रामधील मुले येऊन आम्हाला सांगतात की, ऑफिसमधील कामामुळे आम्हाला टीव्ही पाहायचा वेळ मिळत नाही. पण, यूटय़ूबवर तुमच्या कार्यक्रमांचे x01व्हिडीओज पाहतो. पाच मिनिटांच्या स्किटमुळे आम्हाला आमचा ताण कमी झाल्यासारखे वाटते. ज्याप्रमाणे ताण कमी करण्यासाठी ‘संगीत थेरपी’चा वापर केला जातो. त्याचप्रकारे विनोदी मालिकासुद्धा आज लोकांच्या मनावर थेरपीप्रमाणे काम करत आहेत. काही स्टँडअप विनोदी कार्यक्रमांमुळे टीव्हीवर विनोदी कार्यक्रमांची लाट आली आहे. यामुळे कित्येक विनोदी कलाकारांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला पाहायला मिळाला. सध्या मराठीतील भाऊ कदम, वैभव मांगले यांसारख्या विनोदी कलाकारांनी याआधीसुद्धा नाटक, चित्रपटांमधून विनोदी भूमिका साकारल्या होत्या. पण, ‘चला हवा येऊ द्या’ किंवा ‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमांमुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली गेली आहे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. प्रेक्षक या विनोदी कलाकारांच्या पाच मिनिटांच्या स्किटला इतका प्रतिसाद देतात तर दीड तासाच्या कार्यक्रमालासुद्धा असाच प्रतिसाद देतील, असा विश्वास वाटू लागला. त्यामुळे विनोदी मालिकांची वेळमर्यादाही मोठी झाली. आता पुरस्कार सोहळे किंवा स्टेज शोमध्येसुद्धा नेहमीच्या निवेदकाच्या ऐवजी विनोदी निवेदकाची आणि त्याने दोन कार्यक्रमांमध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची गरज भासू लागली. पूर्वी नाटकांमध्ये विनोदी किस्से सांगितले जायचे आता त्याचे रूपांतर ‘स्किट’मध्ये झाले आहे आणि लोकांना हा प्रकार आवडू लागला आहे, असे दिसते आहे.
डॉ. नीलेश साबळे चला हवा येऊ द्या

विनोदी मालिकांना सुगीचे दिवस    
आज आपण कितीही म्हटले की विनोदी मालिकांना सुगीचे दिवस आले आहेत, तरी टीआरपीच्या शर्यतीमध्ये x02दैनंदिन मालिकाच आघाडीवर आहेत, हे सत्य नाकारू शकत नाही. पण, विनोदी मालिकांच्या बाबतीत बदल होत आहेत, ही बाब नाकारता येणार नाही. वाहिन्यांवर याआधीही विनोदी मालिका येत होत्या पण, त्यांचे प्रमाण दैनंदिन मालिकांच्या तुलनेमध्ये कमी होते. विनोदी कलाकारांनाही तितकेसे महत्त्व दिले जात नव्हते. पण, आज चित्र वेगळे आहे. काही विनोदी कार्यक्रमांमुळे लोकांचा एकूणच विनोदी मालिका आणि कार्यक्रम यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. आज आपल्याकडील विनोदी कलाकारांना देशविदेशातही चांगला प्रेक्षकवर्ग मिळू लागला आहे. कित्येकदा आम्ही परदेशामध्ये कार्यक्रम करायला जातो तेव्हा लोक आवर्जून आमच्या व्यक्तिरेखांचे कौतुक करतात. आम्हाला मनमुराद दाद देतात, ही भावना सुखावून जाते.
किकू शारदा कॉमेडी नाइट्स विथ कपिल

सास-बहूच्या रडक्या मालिकांना प्रेक्षक कंटाळले आहेत..
लोकांना आज टीव्ही लावल्यावर निखळ मनोरंजन हवे असते. सास-बहूच्या रडक्या मालिका, त्यांचे वादविवाद, हेवेदावे याचा लोकांना उबग आला आहे. त्यामुळे सध्या टक्केवारी पाहिल्यास १०० पैकी ७० x03  लोकांना विनोदी मालिका पाहायला आवडतात, हे दिसून येते. एक काळ होता जेव्हा मेहमूदसाब यांच्यासाठी चित्रपटामध्ये खास भूमिका तयार केली जायची. मध्यंतरीच्या काळामध्ये ही परंपरा मोडून विनोदी कलाकारांना चित्रपटामध्ये एक-दोन दृश्यांपुरत्या छोटय़ाशा भूमिका मिळायल्या लागल्या. त्यानंतर तर चित्रपटांचे नायकच विनोदी भूमिका साकारू लागले होते. त्यामुळे विनोदी कलाकार काहीसे मागे पडले होते. पण, आता हे चित्र बदलतंय. आता विनोदी विषयांवर आधारित मालिका येऊ लागल्या आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्येच नाही तर पंजाबच्या छोटय़ा गावांमध्येही आमच्या व्यक्तिरेखांच्या नावांनी फॅनक्लब बनू लागले आहेत. त्यामुळे विनोदी कलाकारांनासुद्धा लोकप्रियता मिळू लागल्याचे चित्र सध्या दिसते आहे. या सगळ्यात मुख्य बाब म्हणजे विनोदी कलाकारांच्या हातात पैसे खेळू लागले आहेत. आज टीव्हीवर कितीतरी नवीन वाहिन्या आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी काम उपलब्ध झाले आहे. वाहिन्यांवरील वाढत्या विनोदी मालिकांमुळे एक विनोदी कलाकार म्हणून आपण आपल्या कुटूंबाचे पोट भरू शकतो, हा विश्वास आम्हा कलाकारांमध्ये निर्माण झाला आहे.
गोपी भल्ला: गोपी ‘एफ.आय.आर.’

हसवणं कठीणच असतं!
पूर्वीपेक्षा आज विनोदी कलाकारांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पालटला आहे, हे नक्कीच खरं आहे. यासाठी कारणही तसंच आहे. लोकांना टीव्ही लावल्यावर आपल्या रोजच्या चिंता आणि काळजी विसरून हलक्याफुलक्या मालिका पाहायला मिळाव्यात अशी इच्छा असते. त्यामुळे नेहमीच्या दैनंदिन मालिकांx05पेक्षा ते विनोदी मालिका पाहण्यास जास्त पसंती देतात. एक कलाकार म्हणून विनोदी भूमिका करताना आमच्यावरसुद्धा जास्त जबाबदारी असते. कारण, एकवेळ लोकांना रडवणं सोप्पं आहे, पण त्यांना हसवणं तितकंच कठीण. त्यामुळे आम्ही विनोदी कलाकार असलो तरी आमचे काम मात्र आम्हाला अधिक गंभीरतेने करावे लागते. आज अभिनय क्षेत्रातील कित्येकांचा विनोदी अभिनेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला आहे. आमच्या मालिकांमध्ये जेव्हा बॉलीवूडचे अभिनेते येतात. तेव्हा तेदेखील आमच्या कामाचे कौतुक करतात. सलमान खान, बोमन इराणीसारखे मोठे अभिनेते जेव्हा ‘तुमची मालिका आम्हीच नाही, तर आमच्या घरातलेही नेमाने पाहतात,’ असे सांगतात तेव्हा गहिवरून येते.
दीक्षा वखानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’

अवघडलेपणा नसतो..
एक कलाकार म्हणून तुम्ही व्यक्त करत असलेली भावना लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवणे हेच तुमचे सर्वात मोठे यश असते. मग ती विनोदी व्यक्तिरेखा असो किंवा गंभीर. हल्ली मनोरंजन म्हणजे विनोदवीर असे समीकरण बनले आहे. विनोदी मालिका ही तुम्ही घरातल्या सगळ्यांबरोबर मिळून पाहू शकता. त्यात मोठे-छोटे असा भेदभाव नसतो. काही विशिष्ट कार्यक्रम वगळता विनोदी मालिकांमध्ये अवघडलेपणाx04 कधीच पाहायला मिळणार नाही. तुम्ही एकत्र बसून एखादी विनोदी मालिका पाहत असता तेव्हा घरातली नकारात्मक भावना निघून जाते. त्यामुळे लोकांनासुद्धा अशा मालिका पाहायला आवडतात. विनोदी मालिका किंवा चित्रपट यांचे खरे श्रेय हे लेखकांनासुद्धा जाते. कारण, त्यांच्या कल्पनांना साकारण्याचे काम आम्ही करत असतो. आज मालिकांमध्ये असे काही उत्तम विनोदी लिखाण करणारे लेखक आल्यामुळे या मालिकांचा दर्जाही वाढला आहे.  
जितू शिव्हारे (गधाप्रसाद ‘चिडीयाघर’)