‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी पर्वाच्या प्रोमोद्वारे वकिली व्यवसायाची बदनामी केल्याचा मानहानीचा दावा करणारी खासगी तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ‘गोंडवा गणतंत्र पार्टीचे’ कायदा समन्वयक नसीर अली यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी संजय पांडे यांच्या न्यायालयात दाखल केली आहे. नसीर अली हे एक वकील असून, त्यांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (बदनामी) अंतर्गत तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीबाबतची सुनावणी २३ ऑगस्टला करण्यात येणार आहे.
अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे यजमान असल्याने तेही यास जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त बिग सिनेरी मीडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बसू आणि मल्टी स्क्रीन मीडिया प्रा.लि.चे सचिव राजकुमार बिड्वटका यांच्याविरुद्धदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.