राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण त्यावर अनेक लोक आक्षेप घेताना दिसत आहेत. टीझरमुळे वादात अडकलेला चित्रपट ‘आदिपुरुष’ पोस्टरनंतरही वादात सापडला. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. आता तर या पोस्टरवर आक्षेप घेत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

‘आज तक’च्या वृत्तानुसार, चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार आणि कलाकारांच्या नावे मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःला सनातन धर्माचा प्रचारक म्हणवणारे संजय दीनानाथ तिवारी यांनी ही तक्रार केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काकूकडून लैंगिक शोषण, दहावीत असताना शिक्षिकेने केलं Kiss, घरी कळालं अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याचं खासगी आयुष्य चर्चेत

‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्याने ‘रामचरितमानस’ या हिंदी धार्मिक पुस्तकातील पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हिंदू धर्मीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ४३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ ‘रामचरितमानस’ या मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या चरित्रावर ‘आदिपुरुष’ हा बॉलीवूड चित्रपट बनवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. “सनातन धर्म अनेक युगांपासून ‘रामचरितमानस’ या पवित्र ग्रंथाचे पालन करीत आहे. त्यातील उल्लेखानुसार हिंदू धर्मात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम आणि इतर सर्व पात्रांचे विशेष महत्त्व आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणातील सर्व कलाकारांना जानवं न घालता दाखवण्यात आले आहे आणि ते चुकीचे आहे,” असं तक्रारकर्त्याने म्हटलं आहे.

रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्रिती सेनॉनच्या भांगात कुंकू नाही, त्यामुळे तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. तसंच असं करून ते सनातन धर्माचा अपमान करत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमध्ये हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात भारतातील विविध राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो, असंही तक्रारीत म्हटलं आहे.