प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सरन्या पोनवन्नन हिच्या विरोधात शेजाऱ्यांनी तक्रार दिली आहे. सरन्याने पार्किंगच्या जागेवरून वाद झाल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली, असं तक्रारकर्त्या महिलेने म्हटलं आहे. सरन्या ही लोकप्रिय तमिळ अभिनेत्री असून तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्यांच्या आईच्या भूमिका साकारल्या आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, सरन्या आणि तिची शेजारीण श्रीदेवी यांच्यात घरासमोरील पार्किंगच्या जागेवरून भांडण झालं. श्रीदेवी तिची कार पार्किंगमधून बाहेर काढत असताना सरन्याच्या कारला लोखंडी गेट धडकला आणि तिच्या गाडीचं नुकसान झालं. यावरून सरन्या आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबात भांडण झालं. प्रसिद्ध अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास 'थंथी टीव्ही'च्या वृत्तानुसार, श्रीदेवीने सरन्याविरोधात स्थानिक चेन्नई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सरन्याच्या गाडीचं नुकसान झालं, त्यासाठी मी तिची माफी मागितली आहे. पण तरी तिने मला त्रास दिला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असं श्रीदेवीने म्हटलं आहे. श्रीदेवीच्या घराबाहेरील सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सरन्या, तिचा पती आणि इतर काही जण श्रीदेवीशी भांडताना दिसत आहेत. “मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…” https://www.instagram.com/p/Cwm81lfPg9Y/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दुसरीकडे, सरन्यानेही श्रीदेवीविरोधात तक्रार दिल्याचं कळतंय. श्रीदेवी जाणीवपूर्वक आपल्या पार्किंगच्या जागेवर गाडी पार्क करत असून तिने आपल्यासाठी अर्वाच्य शब्द वापरल्याचं सरन्याने तक्रारीत म्हटलं आहे. सरन्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने मणि रत्नम यांच्या 'नायकम' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यानंतर तिने तमिळसह अनेक तेलुगूर चित्रपटही केले. 'राम', 'ओरु कल ओरु कन्नडी', 'एम मगन', 'कलावाणी' आणि 'वेलायिला पट्टाथरी' हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. ती शेवटची 'कन्जुरिंग कन्नप्पा'मध्ये दिसली होती.