‘बड़े अच्छे लगते हैं २’ नकुल मेहतासोबत दिव्यांका त्रिपाठी नाही तर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री करणार रोमॅन्स

तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार ही लोकप्रिय जोडी.

divyanka-nakul-disha
Photo-Loksatta File Image

अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेल्या  ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेला एक दशक लोटून गेलं आहे, तरी आजही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या पर्वाच्या प्रतिक्षेत आहेत. काही  दिवसांपासून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय मालिका ‘बड़े अच्छे लगते हैं’च्या २ऱ्या पर्वात काम करणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यानंतर दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितले होते की ती या भूमिकेशी कनेक्ट करू शकत नसल्याने तिने निर्मात्यांना नकार कळवला आहे. आता ‘बड़े अच्छे लगते हैं’च्या २ सीजनमध्ये दिव्यांका नाही तर कोण काम करणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र आता हे कोडं उलगडले आहे.

‘बड़े अच्छे लगते हैं’चे चाहते या मालिकेच्या दुसऱ्या सीजनची आतुरतेने वाटं बघत आहेत. नकुल मेहता यात प्रमुख भूमिका साकारणार हे कन्फर्म होते. मात्र त्याच्यासोबत काम कोण करणार याच्यावर मोठे प्रश्न चिन्ह होते. दिव्यांका त्रिपाठी सोबतच अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती. आता अशी बातमी येत आहे की या मालिकेसाठी नकुल मेहता सोबत राहुल वैद्यची बायको म्हणजेच दिशा परमारचं नाव फायनल करण्यात आले आहे. नकुल आणि दिशाची जोडी ८ वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे. या दोघांनी याआधी ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते.

‘बड़े अच्छे लगते हैं २’ या मालिकेत पुन्हा ही जोडी झळकणार आहे. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’या मालिकेत नकुलने आदित्यची भूमिका साकारली होती. तर दिशा पंखुरीची भूमिका साकारताना दिसली होती. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उत्तरली असून आता पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by DPV (@dishaparmar)

अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं असून आता नकुल मेहता आणि दिशा परमार ‘बड़े अच्छे लगते हैं २’मध्ये प्रमुख भूमिका सकरणार आहेत. त्यामुळे आता ते  ८ वर्षानी पुन्हा  एकत्र काम करणार असल्याने फॅन्स खूप उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Confirm bade ache lagate hain this popular pair will be reunited after 8 years aad