दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्या होत्या, त्यावरून प्रकरण चांगलंच तापलंय. देशभरातून लोक त्याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. अशातच गीतकार मनोज मुंतशिर शुक्ला यांनीही ब्राह्मणविरोधी घोषणांनंतर एक कविता शेअर केली होती. त्यावर काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक यांनी त्यांना टोला लगावत मनोज मुंतशिर यांना भाजपा आयटी सेलचे नवीन सदस्य म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

पंखुरी पाठक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “मुंतशिरमधून अलीकडेच शुक्ला बनलेले भाजपा आयटी सेलचे नवीन सदस्य ब्राह्मण ब्राह्मण करत आहेत. आवाज फुटला आहे आणि विकले गेल्यानंतर शब्दांचं वजनही कमी झालंय. आता ते पोकळ वाटू लागले आहेत. बिचाऱ्यांना माहीत नाही की विकून ‘सावरकर’ बनता येतं पण ‘आझाद’ नाही.”

हेही वाचा – “…ही नवीन ‘नग्नता’ आहे का?”; पंतप्रधान मोदींचे २० फोटो शेअर करत प्रकाश राज यांची पोस्ट

पंखुरी पाठक यांना उत्तर देताना मनोज मुंतशिर म्हणाले, “मला चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, तुमचा उदरनिर्वाह होत राहील. पण वीर सावरकरांसारख्या महापुरुषांबद्दल बोलण्याआधी तुमची लायकी पाहा. इतिहास वाचा, श्रीमती इंदिरा गांधीही सावरकरांच्या प्रशंसक होत्या. बाकी, सिंहांचा आवाज फाटलेला असतो, पण तुम्ही फक्त शेळ्यांचा आवाज ऐकला आहे, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही.”

मुंतशिर यांना उत्तर देत पंखुरी पाठक यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्या म्हणाल्या, “आम्ही विचार करत होतो की ते (मनोज मुंतशिर) कवी होते, त्यामुळे त्यांची थोड्या चांगल्या पदावर नियुक्ती झाली असेल, पण नंतर कळाले की त्यांची गली छाप ट्रोल कॅटेगरीत नियुक्ती करण्यात आली आहे.”

‘मवाली’ चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…

“तुम्ही सावरकरांनी दाखविलेल्या मार्गावर चाला, कारण सरकार बदललं की तुम्हालाही माफीवीर भाग २ बनायचं आहे. फक्त माफी मागायला किती दिवस लागतील हे बघायचं आहे. कारण सरकार गेलं तर पगारही जाणार आणि तुम्ही कुठे जन्मजात संघाचे सदस्य आहात, तुम्ही तर कंत्राटी आहात,” असंही पंखुरी पाठक म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader pankhuri pathak manoj muntashir twitter war called lyricist new member of bjp it cell hrc
First published on: 05-12-2022 at 19:32 IST