scorecardresearch

“हा राजकुमार आपल्या कुटुंबाच्या मूल्यांचे…”, राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडीओवर दिग्दर्शक अशोक पंडीत यांची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता. ज्यामध्ये ते एका क्लबमध्ये असून मुलीसोबत पार्टी करताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून भाजपा समर्थक राहुल गांधी यांना ट्रोल करत आहेत. यावर आता चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी राहुल गांधींच्या पार्टीतील व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “युवा आयकॉन राहुल गांधी देशाच्या समस्यांवर उपाय शोधत असताना नेपाळमधील एका बारमध्ये दिसले. हा व्हिडिओ शूट करून राहुल गांधींचे हे कर्तृत्व ज्याने जगासमोर आणले, त्याला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार द्यायला हवा! निःसंशयपणे हा राजकुमार आपल्या कुटुंबाच्या मूल्यांचे पालन करतो!”, असे कॅप्शन अशोक पंडित यांनी दिले आहे.

आणखी वाचा : व्हायरल मीम फेम अभिनेत्री कॅलिया पोसीचे वयाच्या १६ व्या वर्षी झाले निधन

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

नक्की काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य?

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे. राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader rahul gandhi spotted at party in nepal video goes viral dcp