गेल्या दीड वर्षात निर्बंधांचा सामना केल्यानंतर मुंबई – महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद असली तरी ज्या राज्यांत चित्रपटगृहे सुरू झाली आहेत तिथे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यास निर्मात्यांनी सुरुवात के ली. अक्षय कु मार अभिनीत ‘बेल बॉटम’ चित्रपटाने चित्रपटगृह आणि वितरकांच्या व्यवसायाचा पुन्हा श्रीगणेशा के ला आणि पाठोपाठ ‘चेहरे’, ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ९’, ‘शांग ची अ‍ॅण्ड द लीजंड ऑफ द टेन रिंग्ज’ आणि ‘थलायवी’ सारखे चित्रपट देशभरातून चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना अजूनही विक्रमी कमाई करता आली नसली तरी निदान त्यांनी व्यवसायाची पुन्हा सुरुवात करून दिली ही बाबही चित्रपटगृहांसाठी दिलासादायक ठरली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात आलेल्या करोनामुळे चित्रपटनिर्मिती प्रक्रिया आणि चित्रपटगृह व्यवसाय ठप्प झाला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली, मात्र व्यवसाय स्थिरावण्याआधीच यंदाही एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर बंदीची वेळ आली. आता काही राज्यांतून करोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली. अद्यापही सगळीकडे पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. मात्र त्यासाठी वाट न पाहता जिथे चित्रपटगृहे सुरू झाली आहेत तिथे एक  मोठा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला तर निर्मात्यांच्या दृष्टिकोनात बदल घडू शके ल हा चित्रपटगृह व्यावसायिकांचा अंदाज सध्या खरा ठरताना दिसतो आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्या दिवशी अडीच कोटींची कमाई के ली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या तीन दिवसांत हा चित्रपट १० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात तेवढी कमाई  करण्यासाठी चित्रपटाला अंमळ आठवडाभर वाट पाहावी लागली. आत्तापर्यंत या चित्रपटाने देशात आणि परदेशात मिळून ३९ कोटींपेक्षा अधिक कमाई के ली आहे. करोनापूर्व काळात कोणत्याही मोठ्या कलाकाराच्या चित्रपटाने जेवढी कमाई के ली असती त्या तुलनेत ‘बेल बॉटम’ची कमाई अत्यल्प आहे. पण या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे इतर अनेक छोटे-मोठे हिंदी चित्रपट आणि हॉलीवूडपटही चित्रपटगृहातून प्रदर्शनासाठी तयार झाले आणि बंद पडलेल्या व्यवसायाला काहीएक गती मिळाली.

‘बेल बॉटम’नंतर दुसऱ्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘चेहरे’ चित्रपटाला मात्र तिकीटबारीवर अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी असे दोन मोठे चेहरे असूनही प्रदर्शित झाल्यादिवशी या चित्रपटाने फक्त ४० लाख रुपयांची कमाई के ली. अजूनही या चित्रपटाला फारशी कमाई करता आलेली नाही. तिकीटबारीवरच्या कमाईची ही कोंडी सध्या तरी ‘शांग ची अ‍ॅण्ड द लीजंड ऑफ द टेन रिंग्ज’ आणि ‘थलायवी’ या दोन चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे फु टताना दिसते आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘शांग ची अ‍ॅण्ड द लीजंड ऑफ द टेन रिंग्ज’ने पहिल्या दोन दिवसांत साडेसहा कोटींची कमाई के ली. आठवड्याअखेरीस या चित्रपटाने देशभरातून १८.८ कोटींची कमाई के ली आहे. त्या तुलनेत या चित्रपटाच्या बरोबरीने प्रदर्शित झालेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ९’ची क माई कमी झाली आहे. भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलीवूडपटांमध्ये ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ची गणना होते. यावेळी मात्र चित्रपटाने आत्तापर्यंत साडेबारा कोटींची कमाई के ली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘थलायवी’ने पहिल्या दिवशी सव्वा कोटींच्या आसपास कमाई के ली आहे. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाला तमिळनाडूतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असला तरी उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्लीतूनही चित्रपटाने २० ते २५ लाखांची कमाई के ली आहे. हे सगळे चित्रपट मुंबई – महाराष्ट्रातून प्रदर्शित झाले असते तर त्यांच्या कमाईच्या आकड्यात निश्चिातच मोठी भर पडली असती. त्यामुळे दीड वर्षांच्या निर्बंधांनंतर किमान इतर राज्यातून चित्रपटगृह व्यवसायाचा श्रीगणेशा झाला असला तरी मुंबई -महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू व्हावेत यासाठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृह व्यावसायिकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारडे पाठपुरावा सुरू के ला आहे.

४८०० कोटींचे आर्थिक नुकसान?

आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस अशा वेगवेगळ्या बहुपडदा चित्रपटगृह समूहांनीही एकाचवेळी आपापल्या समाजमाध्यमांच्या खात्यांवरून सरकारला चित्रपटगृहे सुरू करण्याची विनंती के ली आहे. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या संघटनेंतर्गत या समूहांनी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू के ला आहे. देशात इतर राज्यांत चित्रपटगृहे सुरू झाली असली तरी हिंदी चित्रपटांसाठी मुंबई – महाराष्ट्र ही मोठी बाजारपेठ असल्याने येथील चित्रपटगृहे सुरू होणे गरजेचे आहे, याकडे संघटनेने या पत्रातून लक्ष वेधले आहे. दर महिन्याला ४०० कोटी याप्रमाणे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील चित्रपट वितरक आणि प्रदर्शकांचे ४८०० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा या व्यावसायिकांनी के ला आहे. राज्यभरात १००० चित्रपटगृहे असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या मार्चपासून आत्तापर्यंत दोनदा बंदीचा सामना करावा लागलेल्या चित्रपटगृह व्यवसायाचे कं बरडे मोडले असून आर्थिक दुरावस्था झाली आहे. निर्बंध लादल्यानंतर पहिल्यांदा चित्रपटगृहांवर बंदी आणली गेली आता सगळ्यात शेवटी सुरू होणाराही हाच व्यवसाय असेल, अशी हताश भावना व्यक्त करत राज्यातील चित्रपटगृह व्यवसायाला वाचवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती के ली आहे. राज्यात मॉल, हवाईसेवा, उपाहारगृहे, लोकल, जिम सगळे काही पूर्ववत सुरू करण्यात आले असताना चित्रपटगृहांवर अजूनही बंदी का?, असा सवालही संघटनेने उपस्थित के ला आहे. चित्रपटगृहांमध्ये लोकांची गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे, निर्जंतुकीकरण आणि अंतरनियम पाळण्याच्या दृष्टीने अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही चित्रपटगृहे सुरू करण्यास सरकारकडून होणाऱ्या विलंबाबत त्यांनी नाराजी व्यक्त के ली आहे. चित्रपटगृहे सुरू करण्याच्या ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या मागणीला ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’सारख्या विविध चित्रपट संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.