‘या’ चित्रपटातून हरभजन सिंग करणार चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण

या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे.

हरभजन सिंह, फ्रेंडशिप, harbhajan singh debut film friendship, harbhajan singh debut film, Harbhajan Singh, Friendship, Bollywood,
या वर्षी हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला होता. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

हरभजन सिंगने वाढदिवसानिमित्त ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असल्याची घोषणा केली. दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि लोसलिया यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजन पॅकेज असणार आहे. निर्मात्यांनी सिंग आणि त्याच्या मित्रांसोबत ‘रापचिक’ अवतारातील एक आकर्षक पोस्टर आणि लिरिकल व्हिडीओ शेयर करून या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील ही अभिनेत्री सोडणार मालिका?

हरभजन सिंग या आधी एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. मात्र आता ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटात तो मूख्य भूमिकेत दिसणार आहे. पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभलेला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमुळे प्रसिद्धिच्या झोतात असलेला हरभजन सिंग सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘फ्रेंडशिप’ या चित्रपटात हरभजन आणि त्याच्या मित्रांची कथा दाखवण्यात येणार आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असेलला हरभजन आपल्या मित्रांसोबत मिळून सीनिअर्सच्या रॅगिंगपासून स्वत:ला कसे वाचवतो हे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या वर्षी हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricketer harbhajan singh debut film friendship new poster avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या