scorecardresearch

Video: “चहल भाऊ वहिनी नशेत…”, पार्टीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे धनश्री वर्मा ट्रोल

धनश्री वर्माचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

dhanashree verma troll
धनश्री वर्मा ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारताचा स्टार क्रिकेटर यजुवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच धनश्रीला एका पार्टीत स्पॉट करण्यात आलं. या पार्टीतील धनश्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन धनश्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पार्टीसाठी धनश्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. केस मोकळे सोडत धनश्रीने ग्लॅमरस लूक केला होता. परंतु, धनश्रीच्या या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत धनश्री नशेत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा>> Pathaan Box Office Collection: पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच बोलबाला; कमावले ‘इतके’ कोटी

हेही वाचा>> रितेश देशमुखच्या चित्रपटातील गाण्यावर मुलीने बनवलेला व्हिडीओ संजय राऊतांनी केला शेअर, म्हणाले “वेड…”

एका युजरने या व्हिडीओवर “चहल भाऊ वहिनी नशेत आहेत”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “नशा करणाऱ्यांना थंडी वाजत नाही, असं ऐकलं आहे”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत “नशा केला आहेस का?” असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा>> “त्याच्या धर्मामुळे…”, ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानचा फोटो शेअर करत हेमांगी कवीची पोस्ट

धनश्री एक उत्तम डान्सर आहे. अनेक डान्स व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. २०२० मध्ये यजुवेंद्र चहल व धनश्रीने लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:16 IST