scorecardresearch

“ती घरात…” लग्नानंतर पत्नी अथियाबद्दल के.एल.राहुलचं वक्तव्य

अथियाच्या लग्नानंतर तिचे पिता अभिनेता सुनिल शेट्टी खूपच आनंदी झाला आहे तसेच तो जावयाचेदेखील कौतुक करताना दिसून येतो

kl rahul final
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोमवारी (२३ जानेवारी) विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत के.एल.राहुल व अथिया शेट्टी यांनी सप्तपदी घेतली. यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरवात झाली आहे. दोघे हे खुश आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत के.एल.राहुलने अथियाबद्दल वक्तव्य केलं आहे.

या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली. आता लग्नानंतरचे त्यांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत दोघे एकमेकांना किती ओळखतात याबद्दल सांगितले आहे. अथियाने राहुलला विचारले की “मी घरात कोणाला जास्त घाबरते? घरातल्या कोणाशी मी जवळ आहे?” त्यावर के.एल.राहुल राहुल म्हणाला “घरात तू कोणालाच घाबरत नाहीस आणि तू तुझ्या आईच्या खूप जवळ आहेस.”

“मला ती आजही आठवते…” ‘तारक मेहता’ मधील जेठालालने दयाबेनबद्दल व्यक्त केली खंत

दोघांना प्रश्न विचारण्यात आला की “तुमच्या दोघांपैकी उत्तम स्वयंपाक कोण करतं?” त्यावर अथिया म्हणाली “के.एल.राहुल उत्तम जेवण बनवतो. मी करोनाकाळात जेवण बनवण्याचा प्रयत्न केला मात्र मी केलेल्या पोळ्या जर जास्तच भाजल्या गेल्या. “दोघांपैकी कोण आधी माफी मागतो, असे विचारले असता अथिया म्हणाली की, “तिला नेहमी आधी सॉरी म्हणावे लागते.” यावर केएल राहुल म्हणतो की “अथिया सॉरी म्हणते कारण ती नेहमीच चुकीची असते.”

अथिया व के.एल.राहुल अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चाहत्यांसह बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 09:13 IST