सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट

अभिनेता सलमान खानची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट
येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ ची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘दगडी चाळ’ मध्ये ‘डॅडीं’चा विश्वासू सूर्या ‘दगडी चाळ २’मध्ये अचानक त्यांचा तिरस्कार करु लागला आहे आणि याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अशात आता आणखी एका खास कारणाने हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. ‘दगडी चाळ २’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असताना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या चित्रपटासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

‘दगडी चाळ २’ चित्रपटातील ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे धम्माल गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- Video : “…कारण मी अनिल कपूरची मुलगी आहे” म्हणत सोनमने उडवली अर्जुनची खिल्ली

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर डेझी शाहचं ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे गाणं शेअर केलं आहे. यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, “दगडी चाळ २ च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा” सलमान खानच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा असून अभिनेत्री डेझी शाहने या पोस्टवर कमेंट करत सलमानचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा- ‘दगडी चाळ २’ मध्ये अंकुश चौधरीनंतर पूजा सावंतचा लूक समोर, रोमँटिक अंदाजातील पोस्टर पाहिलात का?

दरम्यान डॅडी आणि सूर्याचे नाते आपण ‘दगडी चाळ’ मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. नॉलेजचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनतो. पण ‘दगडी चाळ २’ मध्ये असे काय घडले? सूर्या डॅडींचा इतका राग राग करताना दिसतोय? तर याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळाणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत दिसणार असून येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daagdi chaawl 2 salman khan share special post for ankush chaudhari film mrj

Next Story
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं बेबीमून, सोनम कपूरच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी