लेकीच्या लग्नानंतर अनिल कपूर मुंबई पोलिसांना म्हणताहेत, मी तुमचा ऋणी

सोनम- आनंदच्या लग्नापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी आणि संगीत सोहळ्यालाही बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.

anil kapoor
अनिल कपूर

अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्लीस्थित व्यावसायिक आनंद अहूजा यांच्या लग्नाला आता काही दिवस उलटून गेले असले तरीही त्याविषयीच्या चर्चा मात्र शमण्याचं नाव घेत नाहीयेत. अतिशय थाटामाटात ८ मे रोजी मुंबईत सोनम आणि आनंद अहूजाची लग्नगाठ बांधली गेली. सोनमच्या मावशीच्या बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला. ज्यानंतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

सोनमच्या रिसेप्शन पार्टीमध्ये संपूर्ण बॉलिवूड विश्वाची उपस्थिती पाहायला मिळाली. इतकच नव्हे, तर तिच्या लग्नापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी आणि संगीत सोहळ्यालाही बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. एकंदरच मुंबईच्या अतिशय वरदळ असणाऱ्या भागात कलाकारांची ही मांदियाळी पाहायला मिळाली. ज्यामध्ये नकळतच चाहत्यांचा उत्साहसुद्धा अनावर झाला होता. पण, ही सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांची फार मदत झाली. त्यांच्या याच मदतीमुळे कोणतीही गोंधळाची परिस्थिती न उदभवता कपूर कुटुंबियांच्या घरातील हे मंगल कार्य पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केलं. त्यांच्या या सहयोगाबद्दल अनिल कपूरने ट्विट करत मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. त्याशिवाय आणखी एक ट्विट करत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींचेही आभार मानले आहेत.

‘आमच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत ते इतरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी माध्यमांचे प्रतिनिधी, वार्ताहर, लेखक आणि सर्व छायाचित्रकारांचेही आभार मानतो. तुमचं सहकार्य आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे’, असं म्हणत अनिल कपूर यांनी सोनमच्या लग्नात सहभागी झालेल्या, सहकार्य केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले.

वाचा : VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका

माध्यमांशी असणाऱ्या अनिल कपूर यांच्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोनमच्या रिसेप्शनच्या वेळचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘झक्कास डॅडी’, अनिल कपूर आपल्या मुलीच्या लग्नात आलेल्या छायाचित्रकांरांना हात जोडून अभिवादन करत आहेत. ‘गेल्या ४० वर्षांपासून मी या चित्रपटसृष्टीत काम करतोय. त्यामुळे माझी अब्रू आता तुमच्या हातात आहे’, असं म्हणत अनिल कपूर यांनी माध्यमांचं आपल्या आयुष्यात असणारं स्थान जणून सर्वांसमोर आणलं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daddy bollywood actor anil kapoor thanks mumbai police and media for support during daughter actress sonam kapoors wedding anand ahuja