अर्जुन रामपाल याचा आगामी ‘डॅडी’ सिनेमाचे पहिले ईद मुबारक गाणे प्रदर्शित झाले आहे. ईदच्या दिवशीच हे गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘डॅडी’च्या टीमने घेतला. या गाण्यात ईद हा सण कसा उत्साहाने साजरा केला जातो ते दाखण्यात आले आहे. अर्जुनचा हा सिनेमा कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेला आहे. गवळी जरी हिंदू असला तरी दगडी चाळीत तो सर्वांसोबत ईदचा सण साजरा करायचा हे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. ईदच्यावेळी अरुण तेथील मुस्लिम बांधवांना बिर्याणीचे जेवण द्यायचा. या गाण्यात ट्रेलरमधील काही सीनही दिसतील. या गाण्यात गवळीचे पत्नी आशा गवळीसोबतचे काही भावनिक सीन दाखवण्यात आले आहेत.

देव आनंद यांच्या भावासोबत ही अभिनेत्री होती लिव्ह इनमध्ये; निर्दयीपणे झाली होती तिची हत्या

तामिळ आणि मल्याळम अभिनेत्री ऐश्वर्या राजेशने या सिनेमात आशाची व्यक्तिरेखा साकारली आहे. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते गवळीसोबत लग्न करेपर्यंतचा हलकासा प्रवास या गाण्यातून दिसतो. या गाण्याला शबाब सबरी आणि तन्वीर हुसैन यांनी गायले असून दानिश सबरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. साजिद-वाजिदने या गाण्याला संगीत दिले आहे. अर्जुन रामपालशिवाय राजेश श्रृंगारपुरे, आनंद इंगळे, उषा नायक आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलर पाहताना, सिनेमात अरुण गवळीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अर्जुनने जीवतोड मेहनत घेतल्याचे स्पष्ट दिसते. एक कुख्यात गुंड ते राजकारण्यापर्यंतचा अरूण गवळीचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक आशिम अहलुवालियाचा हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या सिनेमात अरुणला कोणत्याही प्रकारे हिरो बनवण्यात आले नसून, तो ज्यापद्धतीचा होता तेच दाखवण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/BVOt2uTA08-/