सलमानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठिण, मालदीवला घेते सुट्यांचा आनंद

जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री

लॉकडाउननंतर अनेक कलाकार मालदीवला सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री डेझी शाहचा देखील समावेश आहे. डेझी शाह ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. डेझीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिला ओळखणे देखील कठिण झाले आहे.

डेझीने इन्स्टाग्रामवर मालदीवच्या सुट्यांचा आनंद घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये डेझी समुद्र किनारी वेळ घालवताना दिसत आहे. तसेच तिने तेथे फोटोशूट केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये डेझीने काळ्या रंगाची बिकीनी परिधान केली असल्याचे दिसत आहे. दरम्यान तिला ओळखणेही कठीण झाले आहे. “जादुवर विश्वास ठेवा” अशा आशयाच कॅप्शन डेझीने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

डेझीने ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘हेट स्टोरी ३’ आणि ‘रेस ३’ या चित्रपटांमध्ये भुमिका साकारली होती. डेझी एक उत्तम अभिनेत्री असून एक उत्तम डान्सरदेखील आहे. डेझी सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daisy shah shared a photo from her maldives holiday dcp 98 avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या