scorecardresearch

लावणी कार्यक्रमांनंतर गौतमी पाटीलची राजकारणात होणार एंट्री; अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत

गौतमी पाटीलने राजकारण आणि आगामी गाण्यांबद्दल भाष्य केलं आहे

gautami patil
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. आता ती राजकरणात एंट्री घेणार अशी चर्चा आहे त्यावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणाऱ्या गौतमीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला होता. याबाबतच तिने साम टीव्हीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. तिला पत्रकाराने विचारले की “तुझ्या प्रत्येक कार्यक्रमात गर्दी होते गोंधळ होतो, यावर काय सांगशील?” त्यावर गौतमी म्हणाली, “सगळीकडे गोंधळ होतो असं नाही कोणीतरी मद्यपान करून आले तर होते नाहीतर होत नाही.” पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की “या तरुणांचा उत्साह खूप असतो मात्र या कलेला गालबोट लागते यावर तुझी काय प्रतिक्रिया त्यावर गौतमी म्हणाली, “शोला भरपूर गर्दी असते कधी कधी जागा मिळाली नाही म्हणून किरकोळ वाद होतात पण आपण ते धरून बसायचे नाही. आपले कार्यक्रम चांगलेच होत आहेत.”

“जिनिलीयाला घाबरतोस का?” कपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर रितेश म्हणाला…

पुढे राजकरणाबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “राजकरणात माझी एंट्री होणार नाही. मला अजिबात त्यात रस नाही माझे जे चालू आहे तेच मी पुढे सुरु ठेवणार आहे. इतर कोणतीही गोष्ट मी करणार नाही”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. तसेच तिने आपल्या आगामी गाण्यांबद्दल माहिती दिली आहे.

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. अवघ्या ५०० रुपयांच्या मानधनावर सुरु झालेला गौतमीचा प्रवास आज लाखो रुपयांचा व्यवसाय ठरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:36 IST