फातिमा- इरा म्हणाल्या ईद मुबारक

आमिरची ‘रिल’ आणि ‘रिअल लाइफ’ मुलगी…

Fatima, Ira
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम
‘दंगल’ मागोमाग अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या तिच्या दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून फातिमा पुन्हा एकदा आमिरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी फातिमा आमिरच्या कुटुंबियांसोबत बराच वेळ व्यतीत करताना पाहायला मिळतेय. नुकतेच बकरी ईदच्या निमित्तानेही तिने आमिरच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला. आमिरच्या मुलीसोबत म्हणजेच इरासोबत तिने काही फोटोसुद्धा पोस्ट केले. या फोटोमध्ये फातिमा आणि इरा या दोघीही फार सुंदर दिसत होत्या.

देशभरात ईदचा उत्साह असताना बी- टाऊन सेलिब्रिटींच्या घरीसुद्धा या सणाचा उत्साह पाहायला मिळाला. फातिमाने यावेळी सोनेरी जर असणारी सुरेख साडी नेसली होती. तर, इराने निळ्या रंगाचा शरारा घातला आहे. फातिमा आणि इराचा हा फोटो पाहता त्यांच्यातील मैत्रीचाही अंदाज लावता येतोय. याशिवाय त्यांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये आमिरची ‘रिल’ आणि ‘रिअल’ लाइफ मुलगी एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. फातिमा आणि इराची मैत्री पाहता बॉलिवूडमध्ये आणखी दोन मैत्रिणी ‘फ्रेंडशिप गोल्स’ देत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BYiG-ySnhLa/

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

दरम्यान, ‘दंगल’मधील भूमिका पाहता प्रेक्षकांमध्ये तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. त्यातही आमिर खान, अमिताभ बच्चन अशा दिग्गजांसोबत चित्रपटात काम करण्यासाठी फातिमासुद्धा बरीच उत्सुक आहे. याविषयीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘चित्रपट मोठा असो किंवा छोटा. मी त्यासाठी उत्सुक असतेच. या चित्रपटाच्या (ठग्स ऑफ हिंदोस्तान) बाबतीत सांगायचं झालं तर, सर्व गोष्टी नीट होत गेल्या आणि हा एक परफेक्ट चित्रपट तयार झाला.’ फातिमाच्या बोलण्यातून ‘ठग्स…’ विषयी असलेली तिची उत्सुकता व्यक्त होत होती. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दलचू उत्सुकता आणखी शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dangal girl actress fatima sana shaikh celebrates eid al adha with aamir khans daughter ira see photos

ताज्या बातम्या