श्रीदेवीच्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी जान्हवी भावूक; पोस्ट केली एक चिठ्ठी

त्यांच्या हस्ताक्षरातल्या या चिठ्ठीने जागवल्या आईच्या आठवणी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांचे चाहते त्यांच्या आठवणी जाग्या करत आहेत. सोशल मिडियावर त्यांच्याप्रती प्रेम दर्शवणाऱ्या पोस्ट्सचा, संदेशांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर तर #shridevi हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे. श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत एक चिठ्ठी आणि त्यावर लिहिलेला मजकूर दिसत आहे. “I love you my labbu…You are the best baby in the world” हे त्या चिठ्ठीवर लिहिलेलं आहे. या फोटोसह तिने “मिस यू” असं कॅप्शनही दिलेलं आहे. ही चिठ्ठी श्रीदेवी यांनी आपल्या मुलीसाठी जान्हवीसाठी लिहिलेली असावी. या फोटोजवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

करण जोहर, संजय कपूर, शशांक खैतान, माही कपूर यांनीही जान्हवीच्या या पोस्टवर लाल बदामाचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

२४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यावेळी जान्हवी ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होती. मात्र हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यानंतर तिने नेटफ्लिक्सच्या ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटातही काम केलं. तिचा ‘रुही’ हा राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबतचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daughter janhvi shared handwritten note by mother shridevi vsk