Video : अमेय खोपकर यांनी शेअर केला सिद्धार्थ जाधवचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले…

मनसे नेते अमेय खोपकर यांनी सिद्धार्थ जाधवचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video : अमेय खोपकर यांनी शेअर केला सिद्धार्थ जाधवचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले…
सिद्धार्थचा हा व्हिडीओ मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागच्या काही काळापासून सिद्धार्थचे एका मागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या तो त्याच्या ‘दे धक्का २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाचा हा सीक्वेल असून मागच्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशात सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. सिद्धार्थचा हा व्हिडीओ मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मनसे नेते अमेय खोपकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते राजकीय विषयांसोबतच सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य करताना किंवा चित्रपटांबाबतही बोलताना दिसतात. आता त्यांनी सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून यात सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचे आभार मानताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमेय खोपकर यांनी लिहिलं, “अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘दे धक्का – २’ चा शो हाऊसफुल्ल करण्यासाठी प्रेक्षकांचे आभार मानताना…”

आणखी वाचा- “सिद्धार्थने पहिल्याच दिवशी १२ ऑम्लेट…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव म्हणतोय, “दामोदर हॉलला नाटकं सुपरहिट होतात. पण जय हिंद असेल, हिंदमाता असेल, किंवा मग प्लाझा अशा सर्वच थिएटरमध्ये तुमच्यासारखी मराठी माणसं आमच्यावर प्रेम करतात. ‘दे धक्का २’ संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला अभिमान वाटतो की जय हिंद थिएटरचा आज पहिला हाऊसफुल शो आहे. अमेय खोपकर, महेश मांजरेकर सर यांच्याकडून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. चित्रपट पाहा, एन्जॉय करा आणि मराठी चित्रपट हाऊसफुल करा.” सिद्धार्थचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- “मी त्याचा तिरस्कार…” एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्सबद्दल नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Uunchai first look: अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ऊंचाई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर, म्हणाले “यंदाचा फ्रेंडशिप डे…”
फोटो गॅलरी