scorecardresearch

Premium

दीप सिद्धूच्या निधानाच्या काही तास आधीच गर्लफ्रेंडनं शेअर केली होती स्पेशल पोस्ट

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

deep sidhu, deep sidhu death, deep sidhu girlfriend, reena rai, reena rai instagram, रीना राय, दीप सिद्धू, दीप सिद्धू निधन, दीप सिद्धू गर्लफ्रेंड
दीप सिद्धू आणि त्याची गर्लफ्रेंड रीना राय यांनी १४ फेब्रुवारीला रोमँटिक अंदाजात व्हॅलेंटाइन डेचं सेलिब्रेशन केलं होतं.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनाच्या काही तासांपूर्वी दिप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. पण आता त्याच्या अशा अचानक झालेल्या निधनानं त्याची गर्लफ्रेंड रीनालाही मोठा धक्का बसला आहे. दीप सिद्धूचा अपघात होण्याच्या काही तास अगोदरच रीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट लिहिली होती.

दीप सिद्धू आणि त्याची गर्लफ्रेंड रीना राय यांनी १४ फेब्रुवारीला रोमँटिक अंदाजात व्हॅलेंटाइन डेचं सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी रीनाला काही वेळातच तिचा बॉयफ्रेंड तिला कायमचा सोडून जाईल याची कल्पनाही नव्हती. १४ फेब्रुवारीला इतर प्रेमी युगुलांप्रमाणेच दीप आणि रीनानंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला होता आणि याचे काही फोटो रीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यासोबतच तिनं दीप सिद्धूला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

vivek-vaswani-shahrukhkhan
“त्याच्याकडे १७ फोन आहेत पण…”, चार वर्षांत फोन न करणाऱ्या शाहरुख खानबद्दल विवेक वासवानी यांनी व्यक्त केली खंत
R Ashwin Wife Prithi Pens Emotional post
IND vs ENG : ‘५०० ते ५०१ विकेट्स दरम्यान आमच्या आयुष्यात…’ अश्विनच्या कामगिरीबद्दल पत्नी प्रीतीची भावनिक पोस्ट
Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’

रीना राय आणि दीप सिद्धूच्या या फोटोंमध्ये ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसत आहे. रीनानं यावेळी फ्लोरल प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर दीप जीन्स आणि जॅकेटमध्ये खूपच हॅन्डसम दिसत होता. दोघंही मिररमध्ये पाहून सेल्फीसाठी पोज देत असलेले या फोटोमध्ये दिसत आहेत. निधनाआधी दीपनं गर्लफ्रेंडसोबत चांगला वेळ व्यतित केला होता हे या फोटोमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा- ‘जेव्हा कोणी माझ्याशी फ्लर्ट करतं तेव्हा…’ माधुरी दीक्षितनं केला अजब खुलासा

दीप सिद्धू व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी गर्लफ्रेंड रीना रायसोबत त्याच्या कारमधून दिल्ली ते पंजाब असा प्रवास करत होता. त्यावेळी अचानक केएमपीवर पिपली टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची स्कॉर्पिओ कार एका ट्रकला जाऊन धडकली आणि हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याची गर्लफ्रेंड रीनाची प्रकृती आता स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deep sidhu celebrate valentine day with girlfriend reena rai before death mrj

First published on: 16-02-2022 at 14:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×