scorecardresearch

“मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राज ठाकरेंनी…”, दीपाली सय्यद यांचे ट्वीट चर्चेत

दीपाली यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

raj thakckeray deepali sayyad

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत मांडताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे. यावर आता दीपाली यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे.

दीपाली यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या “मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

आणखी वाचा : “दिघे साहेब गेले तेव्हा अख्खं ठाणं जळत होतं अन्…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

दीपाली आता फक्त अभिनेत्री नाही तर सोबतच त्या राजकारणीही आहेत. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepali sayyad on raj thackeray dcp

ताज्या बातम्या