अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाधून बोगस लग्न लावल्याचा आरोप त्यांच्या माजी स्वीय्य सहाय्यकाने केला आहे. यामुळे दीपाली सय्यद या चर्चेत आल्या आहेत. भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप दीपाली सय्यद यांनी फेटाळले आहे. नुकतंच त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपाली सय्यद यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’वर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ‘भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत’, असे त्या म्हणाल्या. त्याबरोबर “मी त्यांना ट्रस्टवरुन बाजूला केल्याचा राग मनात धरुन माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत”, असे दीपाली सय्यद म्हणाल्या.
आणखी वाचा : “दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर

“माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर झालेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांना माझ्या नावावर पैसे घेताना मी पकडलं आहे. त्यामुळे मी त्यांना ट्रस्टवरुन बाजूला केलं. हाच राग मनात धरून माझ्यावर आरोप करण्यात आले. मी याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार,” असे दीपाली सय्यदने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

दीपाली भोसले यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९-९-२०२१ साली सांगलीत बोगस लग्न लावण्यात आली. २०१६ रोजी एका दाम्पत्याचे लग्न झालं होतं. त्यांना २०१८ साली अपत्य झालं. पण, त्यांचा विवाह दीपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा २०२१ साली लावला. बोगस कामांसाठी राज्यपाल कोश्यारी दीपाली सय्यद यांना सहकार्य करतात. दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल का मेहेरबान आहेत, याची चौकशी राज्य शासनाने करावी,” अशी मागणीही भाऊसाहेब शिंदे यांनी केली होती.

आणखी वाचा : नृत्यांगना, अभिनेत्री ते राजकारण, शिंदे गटात जाणाऱ्या दीपाली सय्यद यांच्याबद्दल माहितीये का?

“दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सय्यद यांनी हजारो कोटी रुपयांचं वाटप केलं. पण, ऑडिट रिपोर्ट मिळाल्यावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये फक्त ९ हजार १८२ रुपये आढळून आले. मग बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कोणी दिली आणि कुठून आणली याची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी. जर ही चौकशी झाली नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासमोर आत्मदहन करु असा इशारा माजी स्वीय्य सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepali sayyed react on bogus marriages from charitable trust allegation former personal assistant nrp
First published on: 08-12-2022 at 13:05 IST