फोटो पाहून दीपिकालाही बसला जबरदस्त धक्का, तुम्ही याला ओळखलंत का?

अनेकदा त्याचा पेहराव सोशल मीडियावर थट्टेचा विषयही ठरला आहे. पण तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा अशा मताचा तो आहे.

'१९८५ पासून मी असाच आहे.'

अभिनेता रणवीर सिंग हा अभिनयाबरोबरच त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याचा वेश संभ्रमात पाडतो. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्यानं केले नसतील एवढे प्रयोग रणवीरनं त्याच्या स्टाईलमध्ये केले आहेत. अनेकदा तर त्याचा पेहराव सोशल मीडियावर थट्टेचा विषयही ठरला आहे, पण फॅशन क्रिटीक्सच्या टीका रणवीर फारशा मनावर घेत नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा अशा मताचा तो आहे. कदाचित बॉलिवूडमध्ये आल्यापासून रणवीर स्टाईल आणि लूकबाबत अधिक दक्ष झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे.

रणवीरनं रविवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून दीपिकाच काय पण, बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना जबरदस्त धक्का बसला आहे. ‘१९८५ पासून मी असाच आहे. मी अॅव्हां गर्द आहे’ आहे असं त्यानं म्हटलं आहे. जे व्यक्ती नाविन्यपूर्ण पण तितकंच हटके आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी भन्नाट करतात त्यांच्यासाठी ‘अॅव्हां गर्द’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. अर्थात अशा व्यक्तींच्या फळीत रणवीर येतोच हे त्यानं सिद्ध केलं. ३३ वर्षांपूर्वीदेखील रणवीरनं असा हेअरकट ठेवण्याचं धाडस केलं याचंच अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

रणवीरनं फोटो शेअर केल्यानंतर दीपिकासह अजूर्न कपूर , सिद्धार्थ कपूर, अदितीराव हैदरी, शिखर धवन, दिशा पटानी या सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepika padukon priceless reaction on ranveer singh throwback pic

ताज्या बातम्या