कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दीपिकाने केला खास प्लान

एका मुलाखतीमध्ये दीपिकाने हा खुलासा केला आहे

deepika and ranveer
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग

बॉलिवूडची ‘मस्तानी’ अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकले. यावर्षी दीपिका आणि रणवीर लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणार आहेत. त्यामुळे ते कशा प्रकारे दिवाळी साजरी करणार? कुठे साजरी करणार? कुणासोबत साजरी करणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांच्या या सर्व प्रश्नांना खुद्द दीपिकाने एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे.

दीपिकाचा आगामी चित्रपट ‘छपाक’ आणि ’83’चे नुकताच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येती दिवाळी दीपिका निवांत साजरी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दीपिकाने ही दिवाळी खास करुन कुटुंबियांसोबत साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. ‘आपल्या कुटुंबाला वेळ देणे फार महत्त्वाचे असते. रणवीर आणि मला प्रत्येक सण कुटुंबियांसोबत साजरा करायला आवडतो. त्यामुळे यंदाची दिवाळी मी माझ्या कुटुंबियांसोबत साजरी करणार आहे. त्या दरम्यान आम्ही कोणताही प्रोजक्ट घेणार नाही’ असा खुलासा दीपिकाने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात इटलीतल्या लेक कोमो परिसरात दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडला होता. पारंपरिक कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दीप- वीरने मित्रपरिवारासाठी बेंगळुरू आणि मुंबईत स्वागत-समारंभाचे आयोजन केले होते. लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये यासाठी त्यांनी विशेष काळजी घेण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepika padukone and ranveer singh diwali plans avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या