विवाहस्थळासाठी रणवीर- दीपिकाने खर्चे केले तब्बल इतके रुपये

आपलं लग्न जगातील सर्वात सुंदर ठिकाणी व्हावं अशी दीपिका आणि रणवीरची इच्छा होती

रणवीर- दीपिका

बॉलिवूडमधलं सर्वात लाडकं जोडपं दीपिका आणि रणवीर पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. हा बॉलिवूडमधला सर्वात मोठा विवाहसोहळा असणार आहे. विशेष म्हणजे आपलं लग्न जगातील सर्वात सुंदर ठिकाणी व्हावं अशी दोघांची इच्छा होती म्हणूनचं इटलीतील स्वर्गाहून सुंदर लेक केमो परिसरात हे दोघंही लग्नगाठ बांधणार आहे.

यापूर्वी हॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटी जोडप्यानं याच ठिकाणी साता जन्माच्या शपथी घेतल्या होत्या. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार लेक केमो परिसरातील Villa Del Balbianello या आलिशान व्हिलामध्ये दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. या व्हिलाचं भाडं ८ ते २५ लाखांच्या आसपास असल्याचं समजत आहे. या आलिशान व्हिलातून लेक केमो परिसराचं नयनरम्य दृश्य नजरेस पडतं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र दीपिका आणि रणबीरनं आपल्या विवाह स्थळाबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

खात्रीलायक सुत्रांच्या वृत्तानुसार इटलीतच हा विवाहसोहळा होणार असल्याचं समजत आहे. या लग्नासाठी केवळ ३० लोक उपस्थित राहाणार असल्याचं म्हटलं जात आहे. १४ आणि १५ ऑगस्ट असे दोन दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे. सिंधी आणि दाक्षिणात्य पद्धतीनं दोनदा लग्न होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. विवाहसोहळ्यानंतर भारतात मित्रपरिवार आणि संपूर्ण बॉलिवूडसाठी रिसेप्शनचंही आयोजन करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone and ranveer singh wedding destination lake como italy

ताज्या बातम्या