‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. या चित्रपटामुळे कलाविश्वाला एक नवा चेहरा मिळाला. स्मित हास्य आणि दर्जेदार अभिनय यामुळे दीपिकाने आज प्रत्येकाच्या मनावर भूरळ घातली आहे. त्यामुळेच तिची लोकप्रियता तुफान आहे. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ इन्स्टा किंवा फेसबुकवर शेअर करत असते. यामध्ये तिने तिच्या लहानपणीचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याचप्रमाणे दीपिकानेदेखील इन्स्टावर तिच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपैकी काही फोटो तिच्या वडिलांसोबत किंवा भावंडांसोबत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दीपिका प्रचंड वेगळी दिसत असून तिला ओळखणंही कठीण आहे.
दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘पद्मावत’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘रामलीला’ या सारखे लोकप्रिय चित्रपट केले आहे. या चित्रपटांच्या लोकप्रियतेनंतर ती लवकरच ‘छपाक’ आणि ’83’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. छपाक हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या जीवनावर आधारित आहे.
