scorecardresearch

‘एवढे पैसे आहेत, शाम्पू- तेल विकत घे…’ सेल्फीच्या नादात दीपिका झाली ट्रोल

नुकत्याच शेअर केलेल्या एका सेल्फीमुळे दीपिका पदुकोणला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

‘एवढे पैसे आहेत, शाम्पू- तेल विकत घे…’ सेल्फीच्या नादात दीपिका झाली ट्रोल
दीपिका सध्या नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे ट्रोल होताना दिसत आहे.

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चाहत्यांसाठी स्टाइल आयकॉन असतात. अनेकदा त्यांची स्टाइल, फॅशन सर्वजण फॉलो करताना दिसतात. पण काही वेळा काहीतरी वेगळं किंवा हटके करण्याच्या नादात या बॉलिवूड कलाकारांना सोशल मीडियावर टीकेचाही सामना करावा लागतो. आता अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काहीसं असंच घडलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी दीपिका सध्या नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे ट्रोल होताना दिसत आहे.

दीपिका पदुकोणनं तिच्या इन्स्टाग्रामवर एका विस्कटलेल्या केसांमधील सेल्फी शेअर केला होता. हा सेल्फी शेअर करताना दीपिकानं त्याच्या कॅप्शनमध्ये, ‘हेअर फ्लिप करण्यात मी अयशस्वी ठरले.’ असं लिहिलं आहे. दीपिकानं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

दीपिकाच्या या फोटो कमेंट करत अनेक युजर्सनी तिच्या हेअर स्टाइलची खिल्ली उडवली आहे. काही युजर्सनी तर तिला चक्क हेअर कट करण्याचा सल्लाही दिला आहे. दीपिकाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘अंघोळ करून घे, एवढीही थंडी नाहीये.’ दुसऱ्या एका युजरनं दीपिकाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘तू केसांना साबण लावून पाहा.’ तर अन्य एका युजरनं लिहिलं, ‘एवढे पैसे आहेत त्याचं करणार काय आहेस. शाम्पू आणि तेल विकत घे.’

दरम्यान दीपिकाच्या कामाबाबत बोलायचं तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘८३’ चित्रपटात दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे ‘गहराइयां’ ‘फायटर’ आणि ‘द इंटर्न’चा हिंदी रिमेक हे चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone got trolled after share messy hair selfie mrj

ताज्या बातम्या